नवी दिल्ली : वास्तुशास्त्राचा आपल्या जीवनावर कमी-अधिक प्रमाणात परिणाम होत असतो. अनेकदा धनसपंदा येऊनही घरात टिकत नाही. यामुळे आर्थिक तंगी कायम राहते. अनेकदा असे होते या समस्याचे कारण आपल्या घरातच असते. याचे निराकरण केल्यास धनसंपदा वाढेल.
वास्तुविज्ञानानुसार, ज्या घरांमध्ये गळके नळ असतात त्या घरात पैसा राहत नाही. त्यामुळे तो वेळीच दुरुस्त करुन घ्या. जल स्त्रोताची दिशा नेहमी उत्तरेला ठेवा.
घाण दूर करण्याचे काम झाडू करते. घरात येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या नजरेपासून झाडू दूर ठेवली पाहिजे.
धनवृद्धिसाठी तांबे अथवा पितळेच्या नाण्यांना लाल धाग्यात बांधून मुख्य दरवाजावर लावा.
गाईला हिंदू धर्मात मातेसमान मानले जाते. बुधवारच्या दिवशी गाईला चारा खाऊ घालणे शुभ मानले जाते.
जर लक्ष्मी आणि कुबेरची मूर्ती समोरासमोर ठेवल्यास धन आगमनाची गती कमी होते. खर्च वाढतो.