बिग बींच्या चित्रपटांची सिक्वल क्वीन बनली प्रियंका चोप्रा

ज्या सिनेमामुळे अमिताभ बच्चन यांना अँग्री यंग मॅन अशी ओळख मिळाली तो जंजीर पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. मात्र तो नव्या रुपात पहायला मिळणार आहे. या सिनेमांच्या रिमेकची क्वीन बनलीयं प्रियंका चोपडा...

Updated: Sep 3, 2013, 06:53 PM IST

www.24taas.com झी मीडिया, मुंबई
ज्या सिनेमामुळे अमिताभ बच्चन यांना अँग्री यंग मॅन अशी ओळख मिळाली तो जंजीर पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. मात्र तो नव्या रुपात पहायला मिळणार आहे. या सिनेमांच्या रिमेकची क्वीन बनलीयं प्रियंका चोपडा...
बॉलीवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रासाठी हा केवळ एक योगायोग आहे. प्रियंका चोप्रा स्वतःला नशीबवान समजते. ती लहान पणापासूनच अमिताभ बच्चन यांची फॅन आहे. बीग बीच्या चित्रपपटांच्या सिक्वलची क्वीन बनल्यामुळे देसी गर्ल फार आनंदी आहे.
प्रियंकाने सांगितले की, “मला त्यांची हिरोईन म्हणून काम करता आलं नसलं तरी त्यांच्या चित्रपटाच्या रिमेकमध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे. मला त्यांच्या प्रत्येक चित्रपटांच्या रिमेकमध्ये असेलच असं नाही. तो चित्रपटही त्या दर्जाचा असायला पाहिजे.”
चाळीस वर्षांपूर्वीच्या जंजीरमध्ये जया बच्चन यांनी मालाची भूमिका साकारली होती तर या सिक्वलमध्ये प्रियंका चोप्रा मालाच्या भूमिकेत दिसणार असून यामध्येही प्रियंकाचं नाव मालाचं असणार आहे. प्रियंकाचं नाव जरी तेच असलं तरी ती जया बच्चन यांच्या प्रमाणे चाकू सूरीला धार लावतांना दिसणार नाही तर एका मॉडर्न तरुणीची भूमिकेत प्रियंका रुपेरी पडद्यावर पहायला मिळणार आहे. जंजीरच्या सिक्वलमध्ये विजयची भूमिका साऊथचा मेगस्टार चिरंजीवीचा मुलगा राम चरण तेजाने साकारली आहे.
प्रियंका चोपडाने यापूर्वी डॉन, अग्निपथ या अमिताभ बच्चन याच्या सिक्वल चित्रपटामधून झळकतांना दिसली. अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांचे हे सगळे सिक्वल पाहाता सिक्वलमध्ये हिरो बदलत गेला मात्र हिरोईन कायम राहिली आणि ती म्हणजे प्रियंका चोप्रा... त्यामुळेच बॉलीवूडची ही देसी गर्ल रिमेक क्वीन बनली आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.