www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आगामी निवडणुकांच्या धामधुमीत बॉलिवूडची तीन खान मंडळी 3 पक्षांमध्ये विभागले गेलेत. किंग खान शाहरुख खान काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींचा समर्थक आहे तर आमीर खान यांनी आम आदमी पार्टीचं समर्थन केलंय. तर तिकडे सलमान खाननं मोदींबरोबर पतंगबाजी करून आपला मार्ग कोणते हे दाखवलंय.
आजपर्यंत या तीनही खान मंडळींनी अशा प्रकारच्या छोट्या गोष्टी करून त्यांच्या फॅन्समध्ये योग्य तो संदेश जाईल याची काळजी घेतलीय. शाहरूख खान मै हूँ ना या सिनेमाच्या प्रायव्हेट स्क्रीनिंगसाठी 10 जनपथला गेला होता. त्यानंतरच्या मुलाखतीत शाहरूख खाननं काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींचं कौतुक केलं होतं. मात्र यामागे कुठलाही राजकीय हेतू नसल्याचं सांगण्यास विसरले नाही. शाहरुखचं पडद्यावरील नाव अनेकदा राहुल असंच आहे. 2008 मध्ये राहुल गांधी आणि प्रियांका गांधी शाहरुख खानच्या मालकीच्या कोलकाता नाईट रायडर्सची मॅच पाहण्यासाठी ईडन गार्डन्सवर खेळाडूंना चिअर अप करताना दिसला होता.
शाहरुखचे ट्विटरवर 64 लाख फॅन फॉलोअर्स आहेत. सलमानचे 59 लाख तर आमीरचे 55 लाख फॉलोअर्स आहेत. मात्र असं असलं तरी सलमान खानची लोकप्रियता वादातीत आहे. जनलोकपालाच्या अण्णांच्या उपोषणावेळी आमीर खाननं रामलीलावर हजेरी लावली होती. दिल्लीतल्या आपच्या विजयानंतर आमीरनं आपचे अभिनंदन केलं होतं. पण यात राजकीय हेतू बघू नका असं सांगायलाही आमीर विसरला नाही. तर दबंग सलमान खानचे मुस्लिम समाजात अनेक फॉलोअर्स आहे. त्यानं मोदींना गूड मॅन असं संबोधून आपण याही स्पर्धेत मागे नसल्याचं दाखवून दिलं.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.