रोहितचे लागोपाठ दोन शतकं

ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन डेमध्ये द्विशतकीय खेळी केल्यानंतर लगोपाठ दोन सामन्यात दोन शतकं झळकावून रोहित शर्माने आपण करिअरच्या जबरदस्त फॉर्मात आहे हे दर्शविले आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Nov 15, 2013, 05:21 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन डेमध्ये द्विशतकीय खेळी केल्यानंतर लगोपाठ दोन सामन्यात दोन शतकं झळकावून रोहित शर्माने आपण करिअरच्या जबरदस्त फॉर्मात आहे हे दर्शविले आहे. रोहित शर्माने पदार्पणाच्या कसोटीत १७७ धावांची खेळी केली होती तर दुसऱ्या कसोटीत आज त्याने जबरदस्त नाबाद १११ धावांची खेळी केली आहे.
सचिन ७४ धावांवर बाद झाल्यानंतर सावध खेळी करणाऱया चेतेश्वर पुजाराने मैदानावर उभे राहून आपले शतक पूर्ण केले. शतक पूर्ण होताच पुजाराने भारताच्या `ड्रेसिंग रूम`कडे सचिनच्या पोस्टरकडे बॅट दाखवून आपले शतक सचिनला समर्पित केले. आपल्या वैयक्तीक ११३ धावांवर असताना पुजारा बाद झाला. त्यानंतर कर्णधार धोनी मैदानात फलंदाजीला आला खरा पण, अवघ्या ४ धावांवर बाद होऊन धोनीने प्रेक्षकांना नाराज केले.
आंतराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या सलग दुसऱया सामन्यात रोहितने शानदार शतक ठोकले आहे. अश्विननेही तडफदार फलंदाजी करत सामन्यात ३० धावा ठोकल्या.
सचिन नंतर विराटने पहिल्याच चेंडुत चौकार लगावून पुन्हा स्टेडियमवरील वातावरण जल्लोषमय केले होते. कसोटी असूनही एकदिवसीय सामना असल्याच्या मानसिकतेने विराट कोहली खेळत होता. अवघ्या ७८ चेंडुत ५७ धावाकरून विराट कोहलीही तंबूत परतला.
धावफलक- पहिले सत्र- वेस्ट इंडिज सर्वबाद १८२; भारत सर्वबाद ४९५ , वेस्ट इंडिज दुसरी इनिंग ३ बाद ४३ ( चेतेश्वर पुजारा- ११३, रोहित शर्मा- १११*, सचिन तेंडुलकर ७४)

 
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.