Baal Aadhaar Card : घर बसल्या काढा पाच वर्षांखालील मुलांचे आधार कार्ड; कुठेही जाण्याची गरज नाही

घरच्या घरी  लहान मुलांचे आधार कार्ड काढता येते. जाणून घेऊया अर्ज करण्याची सोपी पद्धत. 

वनिता कांबळे | Updated: Feb 10, 2025, 11:20 PM IST
 Baal Aadhaar Card : घर बसल्या काढा पाच वर्षांखालील मुलांचे आधार कार्ड; कुठेही जाण्याची गरज नाही title=

Aadhar Card : आधार कार्ड सर्वात महत्वाचा डॉक्यूमेट आहे.  सिम कार्ड घेण्यापासून ते अगदी बँकेत खाते उघडण्यासाठी देखील आधार कार्ड हे बंधनकारक आहे. शाळेत प्रवेशासह विविध कारणासांठी लहान मुलांचे देखील आधार कार्ड काढावे लागते. मात्र, लहान मुलांचे आधार कार्ड पालकांसाठी त्रासदायक ठरते.  मात्र, आता लहान मुलांचे आधार कार्ड काढण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. घर बसल्या ऑनलाईन पद्धतीने पाच वर्षांखालील मुलांचे आधार कार्ड काढता येणार आहे. जाणून घेऊया अर्ज करण्याची पद्धत. 

पाच वर्षांखालील मुलांसाठी बाल आधार कार्डकरिता ऑनलाइन नोंदणी करता येते.  जर तुम्ही तुमच्या मुलांच्या आधार कार्डसाठी अर्ज करता तेव्हा त्यांचे वय पाच वर्षांपेक्षा कमी असल्ययास आई किंवा वडिलांपैकी एकाने मुलासाठी प्रमाणीकरण करावे लागेल. नावनोंदणी फॉर्मवर स्वाक्षरी करून नावनोंदणीसाठी संमती द्यावी लागेल. UIDAI नुसार, पाच वर्षांखालील मुलांना निळ्या रंगाचा आधार नंबर मिळतो जो बाल आधार म्हणून ओळखला जातो.

मुलासाठी आधार कार्डसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया प्रौढांपेक्षा थोडी वेगळी असते. यासाठी वेगवेगळी कागदपत्रे सादर करावी लागतात. ऑनलाईन अर्ज करत असल्यास  UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल.  पालकांच्या आधारद्वारे विचारलेला आधार नोंदणी फॉर्म आणि इतर तपशील भरावा लागले. 

ऑनलाईन अर्ज करताना मुलांचे बायोमेट्रिक तपशील नोंदवले जात नाहीत.  नावनोंदणीसाठी मुलांचा स्पष्ट फोटो,  मुलाचे जन्म प्रमाणपत्र सादर करावे लागते. पालकांच्या आधार कार्डवरून इतर डिटेल्स घेतल्या जातात. अर्ज नोंदणी यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर नोंदणी स्लिप जनरेट होते. यात नावनोंदणी क्रमांक असतो.  फॉर्म सबमिट केल्यानंतर काही दिवसांतच नावनोंदणीच्या वेळी दिलेल्या पत्त्यावर आधार कार्ड पोस्टाद्वारे पाठवले जाते. साधारण 90 दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होते. 

हे देखील वाचा.... GK : भारतातील एकमेव राज्य जिथे नागरिकांचे Aadhaar Card काढले जात नाही; राज्याचे नाव आणि कारण जाणून चकित व्हाल