.
.
हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे,
सर्वांना सुखात, आनंदात, एैश्वर्यात ठेव,
सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर,
आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.
दिव्य संदेश
"तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार"
दिव्य शिकवण
या जगात 'शहाणपण' हे खरे अमृत होय. आपण दुसरयांना जे सुख किंवा दुःख देतो ते सुख-दुःख आपणाकडे बुमरँग होवून न चुकता परत येते, हा निसर्गाचा अटळ नियम नीट लक्षात घेऊन जीवन जगणे हेच खरे 'शहाणपण' होय.
संकल्प
शुभ चिंतावे, शुभ ईच्छावे, वचनी शुभ बोलावे
शुभ कर्मांच्या सामर्थ्याने करावे जीवनाचे सोने
परमेश्वराची व्याख्या
निसर्गनियमांसहित स्वयंचलित, स्वयंनियंत्रित, नैसर्गिक, पद्धतशीर व्यवस्था म्हणजे परमेश्वर. हा परमेश्वर कृपा किंवा कोप करीत नाही तर माणूसच स्वतःच्या कर्मांनी स्वतःवर कृपा किंवा कोप करीतअसतो.
..
.
.