मुंबईची सुरक्षा भाड्यावर!

मुंबईतले पोलीस अधिका-यांची सुरक्षा भाड्यानं घेतलेल्या बुलेट प्रूफ जॅकेटनं केली जातेय. आरटीआयच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीतून याचा खुलासा झालाय. तर सरकारनं याचा इन्कार केला आहे.

Updated: May 12, 2012, 04:28 PM IST

www.24taas.com, मुंबई

मुंबईतले पोलीस अधिका-यांची सुरक्षा भाड्यानं घेतलेल्या बुलेट प्रूफ जॅकेटनं केली जातेय. आरटीआयच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीतून याचा खुलासा झालाय. तर सरकारनं याचा इन्कार केला आहे.

मुंबईवर झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात हेमंत करकरे, अशोक कामटे आणि विजय साळस्कर यांच्यासह अनेक कर्तबगार अधिकारी मारले गेले होते. त्यानंतर उत्तम दर्जाची बुलेटप्रूफ जॅकेट्स उपलब्ध करून देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र सरकारनं फक्त चारच बुलेट प्रुफ जॅकेट्स खरेदी केली आहेत. तर 144 जॅकेट्स भाड्यानं घेतल्याचं उघड झाले आहे.

मात्र गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी भाड्यानं बुलेट प्रुफ जॅकेट्स घेतल्याचा इन्कार केलाय. या आधी सरकारवर निकृष्ट दर्जाचे जॅकेट्स खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा तीच चूक झाल्यानं सरकारवर टीका सुरू झाली आहे.

व्हिडिओ पाहा...

[jwplayer mediaid="99434"]