www.24taas.com, मुंबई
महाराष्ट्रात दुष्काळानं थैमान मांडलय. दुष्काळग्रस्ताचे डोळ्यातलं पाणी तर केव्हाच आटलंय आणि त्यांचं दुःख पाहून अवघ्या महाराष्ट्राच्या डोळ्यात पाणी आलं. दुष्काळाच भान राखत महाराष्ट्रानं पाणी बचतीचा मंत्र स्वीकारलाय. प्रत्येक माणूस जमेल त्या पद्धतीनं तहानलेल्या पाणी देण्यासाठी झटतोय. अंधार दाटलेला असताना दुसरीकडे मात्र झगमगाट पसरणार आहे.. हा झगमगाट असणार आहे, अर्थातच आयपीएलचा.. पाण्यासारखा पैसा उधळणा-या आयपीएलमध्ये आता पाणीही उधळलं जातय.. आणि त्यावरुनच वाद पेटलाय..
आयपीएल क्रिकेट मॅचेस सुरु होण्यास आता अवघे काही तास उरले असतांनाच महाराष्ट्रात होणा-या क्रिकेट मॅचेसवरुन वादाला तोंड फुटलं आहे. महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती या वादाला कारणीभूत ठरली आहे. एकीकडं दुष्काळीभागातील जनतेला घोटभर पाण्यासाठी मौलोनमैल पायपीट करावी लागतेय मात्र दुसरीकडं आयपीएलच्या क्रिकेट मॅचेससाठी स्टेडियमवरच्या हिरवळीवर लाखो लिटर पाण्याचा वापर केला जाणार आहे...
महाराष्ट्रातील दोन शहरात आयपीएलचे सामाने होणार आहेत. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर ८ क्रिकेट तर पुण्यातील गहूंजे स्टेडियम ८ असे एकूण १६ सामने होणार आहेत. एका क्रिकेट ग्राऊंडच्या देखभालीसाठी ५० हजार लीटर पाण्याचा वापर केला जातो..क्रिकेट मॅचेस होण्यापूर्वी १५ आधी पिच आणि ग्राऊंडवर पाण्याचा शिडकाव केला जातो...आय़पीएलच्या ८ दिवस चालणा-या मॅचेससाठी प्रत्येक ग्राऊंडवर ४५ दिवस पाण्याचा शिडकाव केला जाणार आहे... त्या ४५ दिवसात एका ग्राऊंडवर जवळपास २२.५ लाख लीटर पाण्याचा शिडकाव केला जाईल...मुंबई आणि पुणे अशा दोन्ही स्टेडियमचा विचार केल्यास ४५ लाख लीटर पाण्याचा वापर होणार आहे...त्यासाठी २२५ पाण्याचे टँकर मागण्यात येतील.
अर्धा महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना आयपीएलसाठी मात्र लाखो लीटर पाण्याची उधळपट्टी केली जाणार आहे...मात्र मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिका-यांचं म्हणनं काही वेगळचं आहे.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार सर्वसामान्यपणे एका व्यक्तीला रोज तीन लीटर पाण्याची आवश्यकता असतेत.. महाराष्ट्रातील ११ हजार दुश्काळग्रस्त गावांचा विचार केल्यास एका टँकरमधील दहा हजार लीटर पाण्याच्या माध्यमातून ३३०० लोकांची तहान भागवता येईल. आयपीएल क्रिकेट सामन्यासाठी वापरल्या जाणा-या पाण्यावरुन वाद सुरु झाला असून त्यामुळे आयपीएल सुरु होण्याआधीच वादात सापडलं आहे..