पंढरीचा प्रसाद, भाविकांच्या आरोग्याशी खेळ!

पंढरपूरच्या विठोबाचे काही मौल्यवान दागिने लंपास झाल्याची धक्कादायक बातमी झी 24 तासनं दाखवली होती. त्यानंतर आता विठ्ठल मंदिरात प्रसाद म्हणून दिले जाणारे लाडू निष्कृष्ट दर्जाचे असल्याचं उघड झालंय. खुद्द विधी आणि न्याय खात्याच्या अहवालातच पंढरीचं हे वास्तव उघड झालंय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 24, 2013, 09:35 PM IST

संजय पवार, www.24taas.com, सोलापूर
पंढरपूरच्या विठोबाचे काही मौल्यवान दागिने लंपास झाल्याची धक्कादायक बातमी झी 24 तासनं दाखवली होती. त्यानंतर आता विठ्ठल मंदिरात प्रसाद म्हणून दिले जाणारे लाडू निष्कृष्ट दर्जाचे असल्याचं उघड झालंय. खुद्द विधी आणि न्याय खात्याच्या अहवालातच पंढरीचं हे वास्तव उघड झालंय.
पंढरपूरचा विठोबा म्हणजे कोट्यवधी वारक-याचं आराध्य दैवत… आपल्या लाडक्या दैवताचा प्रसाद वारकरी मनोभावं घेतात. मात्र झी 24 तासनं विठ्ठलाचे दागिने लंपास झाल्याची धक्कादायक बातमी उघड केल्यानंतर आता प्रसाद म्हणून दिले जाणारे लाडू किती निष्कृष्ट दर्जाचे असतात हे उघडकीस आणलंय. अत्यंत निष्कृष्ट तेलात या लाडवांची निर्मिती केली जातेय. तसंच ज्याठिकाणी हे लाडू तयार केले जातात ती जागाही अत्यंत अस्वच्छ आहे. खुद्द विधी आणि न्याय विभागाच्याच अहवालातच पंढरीचं हे वास्तव उघड झालंय. मात्र त्यामुळे कोट्यवधी भाविकांच्या जीवाशी खेळ होतोय.

विधी आणि न्याय खात्याच्या अहवालाला मंदिर समितीच्या कार्यकारी अधिका-यांनी केराची टोपली दाखवली आहे. मात्र मंदिर प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे भाविकांच्या जीवाशी मात्र खेळ होतोय.