www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
दलित समाजावर अत्याचाराची घटना घडल्यावर आंदोलनाचा पवित्रा घेणारे रामदास आठवले आणि त्यांचा रिपाइं आठवले गट यावेळी रामदेवबाबांच्या वक्तव्यावर मात्र तब्बल २ दिवस मौन बाळगून होता.
रामदेवबाबा आणि त्यांचा संप्रदाय एनडीएला पाठींबा देतात. त्यामुळे रामदास आठवलेंनी बाबांविरोधात कठोर भूमिका घेतली नाही अशी चर्चा आहे.
मात्र कठोर भूमिकेऐवजी त्यांनी फक्त रामदेव बाबांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.