मोदींचे जोरदार स्वागत, सरकार स्थापनेसाठी वेग
लोकसभा निवडणुकीतील अभूतपूर्व आणि ऐतिहासिक यशानंतर आता केंद्रात नव्या सरकार स्थापनेसाठीच्या हालचालींना वेग आलाय. आज दिल्लीत भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक झाली. या बैठकीत नरेंद्र मोदींच्या शपथविधीची तारीख करण्यात येईल, असे सांगण्यात येत होते, मात्र तारीख निश्चित करण्यात आलेली नाही.
`आप`चा सुपडा, `झाडू`नेच केले साफ
भ्रष्टाचारावर बेंबीच्या देटापासून ओरडणाऱ्या आणि हातात झाडू घेऊन आम्ही राजकारणातील घाण साफ करणार अशी आरोळी ठोकणाऱ्या आम आदमी पार्टीला उभी राहण्याआधीच जनतेने नाकारले. झाडू घेऊन मैदानात उतरलेल्या आम आदमी पार्टीला दिल्लीनंतर मुंबईत जनाधार लाभेल हा आशावाद लोकसभा निकालाने फोल ठरला.
अमेरिका, पाक, लंकेकडून मोदींचे अभिनंदन
भाजपला मिळालेल्या ऐतिहासीक विजयासाठी अमेरिकेने नरेंद्र मोदींचं अभिनंदन केलय. भारतात स्थापन होणा-या नव्या लोकशाही सरकारसोबत काम करायला आवडेल असं व्हाईट हाऊसच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेनं ट्विटर द्वारे म्हटलंय.
मोदींच्या विजयात कोणती राज्य गेमचेंजर ठरली?
भाजप पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदींच्या विजयात मोठा वाटा आहे तो काही राज्यांमध्ये भाजपनं मिळवलेल्या दणदणीत विजयाचा.. पाहूयात ही कोणती राज्य गेमचेंजर ठरली ती.
यापुढेही भारताची प्रगती होत राहो - मनमोहन सिंग
काँग्रेस सरकारच्या काळात आम्ही चांगले काम केले. गेल्या दहा वर्षांमध्ये आम्ही जे प्रगतीचे टप्पे पार केले आहेत, यापुढेही अशीच भारताची प्रगती होत राहो, अशी आशा भारताचे मावळते पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी व्यक्त केली.
मोदींच्या `विजय` यात्रेस दिल्लीत सुुरुवात
विजयानंतर सबका साथ, सबका विकास, असा नवा नारा देत देशाचे भावी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बडोद्यात जोशपूर्ण आणि भावपूर्ण भाषण केलं. सुरुवातीलाच त्यांनी बडोद्याच्या जनतेचे आभार मानले. आजपासून चांगले दिवस सुरू झालेत. देशातल्या जनतेसाठी शरीरातला कण न् कण आणि क्षण अन् क्षण वेचणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, अशा विश्वास त्यांनी देशातल्या जनतेला दिला. आज नवी दिल्लीत भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी राजधानी दिल्लीत दाखल झाले असून, विमानतळापासून त्यांच्या `विजय`यात्रेस सुरुवात झाली आहे.
महाराष्ट्रातून युतीच्या 42 खासदारांची फौज, राजकीय गणिते बलदणार
नरेंद्र मोदींना दिल्लीच्या गादीवर बसवण्यासाठी महाराष्ट्रानंही मोलाचा हातभार लावलाय. 48 पैकी 42 खासदारांची फौज उभी करून महायुतीनं मोदींचं सिंहासन बळकट केलंय. तर सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मोदी लाटेचा एवढा जबर तडाखा बसलाय की, महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीची गणितंच विस्कटून गेलीत.
पावळेचा पाणी पाष्टाक !
लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा विजय आणि काँग्रेसचा पराजय...यानंतरच बोल... कोकणात कौलारु घरे असतात. पावसाच्या दिवसात उतरणीचा भाग संपतो त्याला पावळी म्हणतात. आणि चढणीचा भाग संपतो त्याला पाशीट म्हणतात. पाणी नेहमी उतरणीला असते.ते पावळीतून गळते. पण पाण्याने उलटा प्रवाह स्विकारला तर मालवणी भाषेत याच अतर्क्याला म्हणतात, पावळेचा पाणी पाष्टाक !
राज ठाकरेंची औकात दिसली, पाच ठिकाणी डिपॉझिट जप्त
या निवडणुकीत माझी औकात दाखवून देतो, बघा कशी वाट लावतो, असा कडक इशारा देणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे सपशेल तोंडावरच आपटलेत. लोकसभेसाठी राज्यात 10 ठिकाणी आपले उमेदवार उभे केले होते. त्यापैकी निम्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झालेय.
पहिल्यांदा काँग्रेसशिवाय भाजपचं `शुद्ध सरकार` : मोदी
देशात पहिल्यांदा काँग्रेसशिवाय पूर्ण बहुमत जर कुणाला मिळालं असेल तर ते भारतीय जनता पार्टीला मिळालं आहे. हे काँग्रेसशिवाय भाजपचं शुद्ध सरकार असल्याचं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
ज्यांनी शिवसेना सोडली, त्यांना जनतेनं सोडलं!
लोकसभा निवडणूक 2016चे निकाल आता स्पष्ट झाले आहेत. शिवसेना-भाजप महायुतीच्या कार्यालयांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. विशेष म्हणजे शिवसैनिकांमधला उत्साह तर खूप वाढलेला दिसतोय. कारण ज्यांनी शिवसेना सोडली त्यांना यंदा मतदारांनी सोडलंय.
मोदी वादळातील पडझडीनंतर काँग्रेस नेत्यांचे राजीनामे
नरेंद्र मोदी नावाच्या वादळात भले मोठे वृक्ष उन्मळून पडले आहेत. यात काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनाही पराभवाचा सामना करावा लागला.
कोकणात राणे पराभूत, दीपक केसरकर किंगमेकर
कोकणातले राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देत पक्षाला आणि काँग्रेस नेते नारायण राणे यांना शह दिला. हा शह त्यांच्या कामी आल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांच्या विजयात केसरकर यांना महत्वाचा वाटा आहे. त्यामुळे दीपक केसरकर हिरो झाले आहेत. त्यांनी किंगमेकरची भूमिका बजावली.
सोनिया गांधी यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली
काँग्रेस अध्यक्ष या नात्याने, मी पराभवाची जबाबदारी स्वीकारते, असं सांगून सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारली आहे.
पराभव मान्य, भाजपच्या मागणीला अर्थ नाही - शरद पवार
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने जनतेचा कौल स्वीकारला. महाराष्ट्र सरकार बरखास्त करण्याच्या राज्य भाजपच्या मागणीला अर्थ नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे.
हा विजय शानदार आणि ऐतिहासिक - राजनाथ
प्रचंड मोठ्या विजयानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी हा विजय ऐतिहासिक आणि शानदार असल्याचं म्हटलं आहे, तसेच आम्हाला मिळालेला जनादेश हा परिवर्तनासाठी आहे.
नारायण राणेंचा राजीनामा, मुख्यमंत्र्यांना पत्र
पराभवाची जबाबदारी स्वीकारुन काँग्रेस नेते नारायण राणे यांनी अखेर राजीनामा दिला आहे. तसे पत्र राणे यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पाठविले आहे.
बालेकिल्ल्यातचं मनसेचं डिपॉझिट जप्त
ज्या शहरात मनसेची महापालिकेत सत्ता आहे, जे शहर मनसेचा बालेकिल्ला म्हणून ओळखलं जातं, या नाशिक शहरात मनसेचे लोकसभेचे उमेदवार डॉ.प्रदीप पवार यांचं डिपॉझिट जप्त झालं आहे.
सेलिब्रेटी उमेदवार: किरण खेर, परेश रावल विजयी
लोकसभा निवडणूक 2014मध्ये अनेक सेलिब्रेटींनी आपलं नशीब निवडणुकीत आजमावण्याचा प्रयत्न केलाय. त्यात काहींना यश तर काहींना अपयश पाहावं लागतंय. कोण-कोणते सेलिब्रेटी विजयी झाले आणि कोणते पराभवाच्या छायेत आहे ते पाहूया...
नारायण राणे देणार राजीनामा, रत्नागिरीत प्रतिक्रिया
काँग्रेसचे नेते आणि उद्योग मंत्री नारायण राणे मुलगा नीलेश राणे यांचा पराभव दिसू लागल्याने राणे नाराज झालेत. त्यांनी पराभवाची जबाबदारी म्हणून राजीनामा देण्याची तयारी दर्शविली आहे. तशी माहिती त्यांनी रत्नागिरीत दिली.