नड्डा होणार भाजपचे नवे अध्यक्ष?
भाजपसाठी नवीन अध्यक्षाचा शोध सुरु झालाय. मोदींच्या कॅबिनेटमध्ये विद्यमान भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. त्यामुळं नवीन अध्यक्ष निवडण्यासाठी हालचाली सुरु झाल्यात.
अच्छे दिन... पाक करणार 152 मच्छिमारांची सुटका
नरेंद्र मोदींच्या शपथविधीच्या दिवशी म्हणजेच 26 मे रोजी 152 भारतीय मासेमारांची सुटका करण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारनं घेतलाय.
शरीफ दौऱ्याबाबत तोंडात मिठाची गुळणी का? शिवसेनेला सवाल
पाकिस्तानचं नाव निघताच नेहमी विरोध करणारी शिवसेना आता गप्प का? पाकिस्तानचे पंतप्रधान यांच्या भारत दौऱ्याबाबत शिवसेनेच्या तोंडात मिठाची गुळणी का?, असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलाय.
सोनिया, राहुल गांधीही मोदींच्या शपथविधीला राहणार हजर
नरेंद्र मोदींच्या शपथविधीला सोनिया गांधी आणि राहुल गांधी जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून कळतीये. सोमवारी म्हणजेच 26 मेला संध्याकाळी सहा वाजता मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. यासाठी सोनिया गांधी आणि राहुल गांधींनाही निमंत्रित करण्यात आलं होतं.
नवाझ शरीफांच्या भारतभेटीवर त्यांची मुलगी म्हणते...
नरेंद्र मोदी यांच्या सोमवारी होणा-या शपथविधी समारंभाला पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ येणार असल्याचं नक्की झालंय.
शाझिया इल्मी `आप`मधून बाहेर, केजरीवालांवर टीका
आम आदमी पार्टीच्या स्थापनेपासून कार्यरत असणाऱ्या नेत्या शाझिया इल्मी यांनी `आप`मधील आपल्या सर्व पदांचा राजीनामा देत पक्षाला सोडचिठ्ठी दिलीय. शाझिया यांच्यासोबतच कॅप्टन गोपीनाथ यांनीही राजीनामा दिलाय.
मोदींनी पत्नी मानलं यातच समाधानी - जशोदाबेन
लवकरच पंतप्रधानपदाची शपथ घेणाऱ्या नरेंद्र मोदी यांची पत्नी सध्या आनंदात आहेत. नरेंद्र मोदी पंतप्रधान पदावर आरुढ होणार आहेत आणि त्यांनी पहिल्यांदाच आपल्याला पत्नीच्या रुपात स्वीकार केलंय, याचाच आपल्याला खूप आनंद झाल्याचं जशोदाबेन यांनी म्हटलंय.
नवाझ शरिफांवरून आव्हाडांनी सेनेला डिवचलं!
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीसाठी भारतात येणार हे आता जवळपास निश्चित झालंय. पण यामुळे शिवसेनेची मात्र चांगलीच गोची झालीय...
मोदींविरोधात फेसबुकवर पोस्ट टाकली, जामीन नाकारला
नरेंद्र मोदी यांच्या विरोधात फेसबुकवर पोस्ट टाकल्याने, गोव्यातील देऊ चोडणकर याचा जामीन गोवा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.
राष्ट्रवादी मंत्रिमंडळात बदल करणार
राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या मंत्रिमंडळात फेरबदल करण्याच्या विचारात आहे. विजयकुमार गावित यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर, शरद गावित यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जनमानसात उंची वाढवा, पवारांच्या कानपिचक्या
लोकसभेत राष्ट्रवादीला पराभवाचा सामना करावा लागला आहे, यासाठी आज मुंबईत शरद पवारांनी राष्ट्रवादीची चिंतन बैठक बोलावली होती, या बैठकीत शरद पवारांनी नेत्यांना सूचना दिल्या आहेत.
सोनियांनी केलं मोदींचे अभिनंदन
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी अखेर भावी पंतप्रधान नरेंद्र मोदींना निवडणुकीतल्या विजयाबद्दल अभिनंदन पत्र लिहलंय. काँग्रेसमधल्या सुत्रांनी ही माहिती दिली.
ममता आणि पवारांनी काँग्रेसमध्ये परतावे - दिग्विजय सिंह
लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर आता काँग्रेसमध्ये मतमतांतरे दिसून येतायेत.
भाजप लढण्यासाठी आता नितीश-लालू एकत्र
बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलानं सत्ताधारी जेडीयू म्हणजे जनता दल युनायडेला बिनशर्त पाठींबा दिलाय.
भाजपनंतर राष्ट्रवादीही देणार सोशल मीडियावर भर
भाजपच्या पावलावर पाऊल ठेऊन आता राष्ट्रवादीही सोशल मीडियाच्या प्रचारावर भर देणार आहे.
राज ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार घोषित करा
भारतीय जनता पक्षाने जसे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांचे नाव घोषित केले, त्याच प्रमाणे राज ठाकरे नाव राज्याच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून घोषीत करा, अशी मागणी मनसे पदाधिकाऱ्यांनी आज येथे केली.
मिलिंद देवरा राहुल गांधींवर उलटले
काँग्रेसचे माजी खासदार आणि राहुल गांधींच्या टीममधले मिलिंद देवरा यांनी काँग्रेसच्या अपयशाचं खापर त्यांनी राहुल गांधी यांना सल्ला देणार्या काँग्रेसच्या नेत्यांवरच फोडलं आहे.
मोदींना आईकडून 101 रूपये शगुन
नरेंद्र मोदी आपल्या आईचा आशीर्वाद घेऊन दिल्लीकडे रवाना झाले आहेत. यावेळी नरेंद्र मोदी यांच्या आईने नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर हात फिरवला. तसेच नरेंद्र मोदी यांना 101 रूपये भेटही दिले.
सोनियांच्या जावयाचीही होणार विमानतळावर चौकशी?
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणुकीत विजय मिळवणारं एनडीए सरकार लवकरच अस्तित्वात येणार आहे. त्यामुळे लवकरच, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचा जावई रॉबर्ट वडेरा यांना मिळणाऱ्या सगळ्या सोई-सवलती आता काढून येण्याची चिन्ह दिसत आहेत.
`पाक`च्या पंतप्रधानांनी स्वीकारलं मोदींचं आमंत्रण
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी देश-विदेशांतील नेत्यांना आमंत्रण धाडली गेली आहेत.