www.24taas.com, झी मीडिया, सिंधुदुर्ग
सिंधुदुर्गात काँग्रेस-राष्ट्रवादी वाद चिघळल्याचं दिसतंय. राणेंच्या प्रचारासाठी वरिष्ठांकडून येत असलेला दबाव धुडकावून लावत राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपले राजीनामेच सादर केलेत.
`काँग्रेसनं राणेंच्या प्रचारासाठी दबाव आणू नये` असा इशाराही राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी दिलाय. पक्षानं कारवाई करण्यापेक्षा आपण आधीच राजीनामा देण्यासाठी तयार आहोत, हे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय. राष्ट्रवादीच्या ४०० पदाधिकाऱ्यांची राजीनामे दिलेत. त्यांनी आपले राजीनामेही पक्षांच्या वरिष्ठांकडे सादर केल्याचं समजतंय.
काँग्रेस नेते नारायण राणेंचा मुलगा डॉ. निलेश राणे हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून आघाडीकडून निवडणूक लढवत आहेत. लोकसभेच्या रणधुमाळीत राष्ट्रधुमाळीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ही भूमिका घेतल्यानं राणे पिता-पुत्र मात्र अडचणीत सापडलेत. राणेंना आघाडीचा काहीच फायदा होणार नाही... आणि याचा निवडणुकीत राणेंना फटका बसणार... हे यामुळे स्पष्ट दिसतंय. त्यामुळे, यानंतर राणे यानंतर काय भूमिका घेतायत, याकडे अनेकांचं लक्ष लागलंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.