तामिळनाडू : सत्तापालट होणार?

स्वतंत्र द्रविड नाडुची मागणी, हिंदीला विरोध, प्रत्येक निवडणुकीत सत्तापालट अशी काही तामिळनाडूच्या राजकारणाच्या वैशिष्ट्य राहिलीत. तामिळनाडूच्या राजकारणाचा इतिहास नेमका कसा आहे, हे सांगणारा हा एक लेखाजोखा...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Apr 4, 2014, 11:10 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, चेन्नई
स्वतंत्र द्रविड नाडुची मागणी, हिंदीला विरोध, प्रत्येक निवडणुकीत सत्तापालट अशी काही तामिळनाडूच्या राजकारणाच्या वैशिष्ट्य राहिलीत. तामिळनाडूच्या राजकारणाचा इतिहास नेमका कसा आहे, हे सांगणारा हा एक लेखाजोखा...
तामिळनाडूतील राजकारण नेहमीच द्रविडयन पक्षांभोवती घिरट्या घालतं राहिलंय. 1916 साली साऊथ इंडियन वेल्फेअर असोसिएशनची स्थापना झाली. त्यानंतर याच असोसिएशनचं जस्टिस पार्टी असं नामकरण झालं. पेरिअर म्हणून ओळख असलेल्या इ व्ही रामास्वामी यांनी 1944मध्ये याच पक्षाला द्रविड कळघम असं नाव दिलं.
* 1916 साउथ इंडियन वेल्फेअरची स्थापना
* पुढे जाउन जस्टीस पार्टी नामकरणं
* 1944 मधे द्रविड कळघम नामकरणं
 
द्रविडा नाडू या वेगळ्या राज्याची मागणी करण्यासाठी द्रविड कळघम कार्यरत होता. ध्येय एकच असलं तरी दोन प्रमुख नेत्यांमधील मतभेदांमुळे पक्षाचं विभाजन झालं. सी. एन अण्णादुराई यांनी स्वतंत्र द्रविड मुन्नेत्र कळघमची स्थापना केली आणि 1956पासून सक्रिय राजकारणात पक्षाची मोहोर उमटायला सुरवात झाली.
स्वातंत्र्यानंतर राज्यांची भाषावार विभागणी करण्यात आली आणि 1960 च्या दशकात आपल्या हिंदी विरोधी धोरणामुळे डीएमकेची राज्यातील लोकप्रियता प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढली आणि निवडणुकांत काँग्रेसला धूळ चारत राज्यात पहिल्यांदाच डीएमकेनं सत्ता स्थापन केली. सी एन अण्णादुराई यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, डीएमकेचे ते पहिले मुख्यमंत्री.
1969मध्ये सीएन यांच्या मृत्यूनंतर करुणानिधी यांनी राज्याची सुत्रे हाती घेतली. दरम्यान करुणानिधींच्या नेतृत्वाला पक्षातील एम जी रामचंद्रन यांनी आव्हान दिलं.
* अण्णादुराई डीएमकेचे पहिले मुख्यमंत्री
* 1969मधे अण्णादुराईंचा मृत्यु
* करुणानिंधीनी घेतली सुत्र हाती
* एम जी रामचंद्रनं यांच करुणानिधींना आव्हानं

एमजी रामचंद्रन यांनी 1972मध्ये पक्षातून बाहेर पडत ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम अर्थात एआयएडीएमकेची स्थापना केली. पुढची चार दशकं तामिळनाडूच्या राजकारणात डीएमके आणि एआयएडीएमके या दोन पक्षांचाच बोलबाला राहिला.
1977 मध्ये एमजी रामचंद्रन यांची एआयएडीएमके सत्तेवर आली आणि रामचंद्रन मुख्यमंत्री झाले. 1987ला त्यांचा मृत्यू झाला तोपर्यंत तामिळनाडूचे मुख्यमंत्री रामचंद्रमचं होते. मात्र त्यांच्या मृत्यूनंतर पुन्हा एकदा एआयएडीएमकेचे दोन तुकडे झाले. एकीकडे एमजीआर यांच्या पत्नी जानकी रामचंद्रन आणि दुसरीकडे जे जयललिता.
* 1977 मधे रामचंद्रन सत्तेवर
* 1987 रामचंद्रन यांचा मृत्यू
* पक्षात फूट जानकी रामचंद्रन आणि जयललिता वेगळ्या वाटेवर
अशा परिस्थितीतच 1989च्या निवडणुकीत एआयएडीएमकेचा पराभव झाला आणि जयललीता यांच्या नेतृत्वाखाली पक्ष पुन्हा एकत्र आला. डीएमके आणि एआयएडीएमके दोन्ही पक्षांमध्ये नेहमीच कलह झाला मात्र 1967नंतर या दोन पक्षांनीच आळीपाळीने राज्यात सत्ता स्थापन केलीय. 1984, 1991, 2001 आणि 2011मध्ये एआयएडीएमके तर 1989, 1996, 2006 डीएमकेनं राज्यात सत्ता स्थापन करण्यात यश मिळवलं.
 
* 1984, 1991, 2001 आणि 2011मध्ये एआयएडीएमके
* तर 1989, 1996, 2006 डीएमकेनं राज्यात सत्ता स्थापन करण्यात यश मिळवलं.
 
राज्यावर सरकार कोणत्याही पक्षाचं असलं तरी केंद्र सरकारला नेहमीच राज्यातून पाठिंबा मिळत राहिलाय. राज्यात डीएमके असो वा एआयएडीएमके तर केंद्रात एनडीए असो वा यूपीए राज्यातील राजकारणाचा केंद्रावर तितकासा परिमाण झाला नाही. 
टूजीमध्ये ए राजाची अटक आणि करुणानिधीच्या कन्या कनीमोळी यांच्या तिहार वारीनंतर मात्र डीएमकेनं यूपीएशी नातं तोडलं. निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातली समीकरणं केंद्राशी कशी असतील हे ठरणार आहे.  
सोळाव्या लोकसभेसाठी तामिळनाडुमधे राजकीय गोळाबेरीज सुरु झालीये. 39 जागांसाठी ही लढाई तामिळनाडुमध्ये होतेय. मात्र राज्यात चर्चेचा विषय आहे, तो करुणानिधींचा कौटुंबिक कलह आणि जयललितांच्या राजकीय खेळी. नेमकी राज्याच्या राजकारणाची नस काय आहे हे सांगणारा हा एक रिपोर्ट.
जातीय राजकारण, सूडानं केलेल्या राजकीय खेळी आणि गृहकलह यामुळे तमिळनाडूचं राजकारण तापलय. द्रविड मुन्नेत्र कळघम अर्थात डीएमके पार्टीचे सर्वेसर्वा एम करूणानिधी यांच्या मुलांनी एकमेकांविरोधात ठोकलेले शड्डु हा तामिळनाडुमध्ये चर्चेचा विषय झालाय.
करूणानिधी यांनी आपला मुलगा एम के अळगिरी यांच्यावर पक्षविरोधी कारवाईचा