दशरथ यादव, पुणे
पुरंदरचा कऱ्हेपठार ही इतिहासाची खाण आहे. सह्याद्री पर्वत रांगेची सोबत, कऱ्हाकाठाची जवळीक लाभलेल्या या मातीला इतिहासाचा गंध येतो. छत्रपत्री शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे पहिले ढोलावर टिपरु याच मातीत पडले. अवघड पुरंदराच्या साह्याने शत्रूला जेरीस आणत मावळ्यांना एकवटून आव्हाने उभे केले. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म पुरंदरावर झाला. महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडेराया, ५२ सरदारांच्या जीवावर तगलेल्या पेशवाईला कऱ्हाकाठानेच आधार दिला. पिलाजी जाधवराव यांची गढी, सरदार पानसे यांचा सोनोरीचा मल्हागड, पुण्याचे वेरुळ म्हणून प्रसिद्ध असलेले यादवकालीन भुलेश्वर मंदिर, उमाजीनाईकांचे जन्मस्थान, महात्मा फुले यांचे मूळगाव खानवडी, आचार्य अत्रे यांचे कोडीतगाव, संत सोपानदेवांची समाधी असा वैभवशाली इतिहास लाभला आहे.
८७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सासवड येथे सासवड (ता.पुरंदर) येथे होत आहे. साहित्यक्षेत्रात मोलाची भर कऱ्हाकाठच्या साहित्यिकांनी घातली आहे. साहित्य निर्मीतीची ज्योत तेवत ठेवणारे क-हाकाठावर प्राचीन काळापासून अनेक साहित्यरत्न जन्माला आली. रामायणकार महर्षी वाल्मिकी, संत सोपानदेव, पुरंदरदास, श्रीधरपंत, संभाजीमहाराज, महात्मा फुले, शाहीर सगनभाऊ, होनाजी बाळा, कृ.वा.पुरंदरे, आचार्य अत्रे, साहित्य मार्तंड यशवंतराव सावंत अशा साहित्यरत्नांचा वारसा क-हाकाठाला आहे. बुधभूषण चा मराठी अनूवाद करणारे प्रा.प्रभाकर ताकवले, खरा संभाजी व शिवराय लिहिणारे नामदेवराव जाधव यांच्या पर्यंत मोठा वारसा पुरंदरला आहे.
"सातगड नऊ घाटांची
ही दौलत मराठ्यांची रं
शिवशंभुची ललकार
या मातीतूनी फुटं रं"
असा गौरवशाली इतिहास अंगाखांद्यावर मिरविणाऱ्या कऱ्हाकाठाला जसा इतिहासाचा मोठा वारसा आहे. तसा साहित्यलेखनाची एक परंपरा अव्यहात पणे सुरु आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा पाया येथेच घातला. इंग्रजांना हाकलून लावण्यासाठी महाराष्ट्राचे बार्डोली झालेली सासवड हीच भूमी आहे. अंधश्रद्धा व जातीच्या विळख्यातून समाजाला सोडविणारी सत्यशोधक चळवळ महात्मा फुले यांनी इथेच सुरु केली. साहित्य चळवळही सुरु आहे. क-हाकाठावर साहित्य चळवळीची बीजे स्वातंत्र्यानंत रुजवली ती प्रल्हाद केशव अत्रे यांनी. या सगळ्या प्रेरणा घेऊन संमेलनाचे स्वागताध्यक्ष विजय कोलते यांनी आचायर्य अत्रे विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमाची मुहूर्तमेढ रोवली.
१९९८ साली आठवे विभागीय साहित्य संमेलन क-हाकाठावर झाले. त्यावेळी आचायर्य अत्रे यांच्या जन्मशताब्दी निमित्त अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन व्हावे असा प्रयत्न होता. त्यानंतर दरवर्षी आचार्य अत्रे मराठी साहित्य संमेलन सुरु केले. कऱ्हाकाठाला साहित्याची गोडी यानिमित्ताने लागली. या सगळ्या कामात रावसाहेब पवार, दशरथ यादव पहिल्या पासून आहेत. त्यानंतर एवढी मोठी हिमालयाच्या उंचीची माणसं साहित्यक्षेत्राला लाभली. त्यानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने दशरथ यादव यांच्या संयोजनाखाली महात्मा फुले यांच्या मूळ खानवडी गावी महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन सुरु झाले. त्यानंतर सासवडला छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन सुरु केले. याकामात मला शऱद गोरे, राजकुमार काळभोर, सुनील धिवार, दत्ता भोंगळे, श्रीकृष्ण नेवसे यांची मदत होत. शंभुराजे साहित्यिक होते, त्यांच्या नावाने देशातील हे पहिलेच साहित्य संमेलन सुरु झाले. दरवर्षी ही संमेलने होतात. एकाच तालुक्यात दरवर्षी तीन राज्यस्तरीय साहित्य संमेलने होणारा हा देशातील एकमेव तालुका आहे. त्यामुळे शेकडो साहित्यिकांची रीघ कऱ्हाकाठावर लागते. यातूनच साहित्यचळवळ रुजली. याचाच परिणाम म्हणून ८७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सासवडला होत आहे.
साहित्य संमेलनाच्या निमित्ताने साहित्य रसिकांनाही चांगली गोडी लागली. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने कऱ्हाकाठावर साहित्याचा जागर होऊ लागला.
साहित्यिक संभाजीराजे
छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर १४ मे १६५७ साली झाला. बालपणीच दोन वर्षाचे असताना आई सईबाई यांचे निधन झाले. राजामाता राष्ट्रमाता जिजाऊ यांनी त्यांचा सांभाळ केला. कापूरहोळ येथील धाराउ गाडे या मातेचे दूध देवून संभाजी राजांचे पोषण केले. क-हाकाठावरील पुरंदर हा प्राचीन व ऐतिहासिकदृष्ट्या प्रसिद्ध किल्ला आहे. येथील सह्याद्रि डोंगर रांगेवरील हिरवीगार औषधी वनस्पती गुणकारी आहे. पुरंदरगडाच्या पायथ्याला मावळयांचा मुलासोबत शंभुराजांचे बालपण गेले. छ