उंची वाढवण्यासाठी 10 टिप्स

प्रत्येकाला आपली उंची ही अधिक हवी असते. कमी उंचीमुळे अनेक जण निराश असतात. उंची अधिक असेल तर तो व्यक्ती आकर्षित दिसतो. कमी उंचीच्या व्यक्तींमध्ये आत्मविश्वासही कमी दिसतो.

Updated: Jan 24, 2016, 05:07 PM IST
उंची वाढवण्यासाठी 10 टिप्स title=

मुंबई : प्रत्येकाला आपली उंची ही अधिक हवी असते. कमी उंचीमुळे अनेक जण निराश असतात. उंची अधिक असेल तर तो व्यक्ती आकर्षित दिसतो. कमी उंचीच्या व्यक्तींमध्ये आत्मविश्वासही कमी दिसतो.

१. आत्मविश्वास वाढवा : कमी उंचीमुळे आत्मविश्वास कमी दिसतो. पण अशा वेळेस आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. सकारात्मक विचार केल्यामुळे जीवनात परिवर्तन होते. नकारात्मक विचारामुळेही उंची लवकर खुंडते. 

२. संतुलित आहार : चांगल्या उंचीसाठी चांगला आहार महत्त्वाचा असतो. नकारात्मक विचार आणणारे पदार्थ खाणेही कमी केलं पाहिजे. जंक फूड, चायनिज सारखे पदार्थ, कार्वोनेटेड पेय यासारख्या गोष्टी खाणं टाळले पाहिजे. विटामिनच्या गोष्टींचं अधिक सेवन केलं पाहिजे. 

३. उंची वाढवण्यासाठी 2 काळी मिरी 20 ग्रॅम लोणीसोबत नियमित सेवन करा. 

४. देशी गायचे दूध उंची वाढवण्यासाठी मदतगार असते. रात्री व्यवस्थित झोप घ्या. 

५. उंची वाढवण्यासाठी आंगठा खेचा. त्यामुळे शरिरातील मांसपेशी ओढल्या जातात.
६. वजन कमी असणे ही उंची कमी असण्याचं कारण असू शकतं. त्यामुळे वजन हे चांगलं असलं पाहिजे. 

७. सकाळी उठून धावल्यामुळे उंची वाढण्यास मदत होते. सुर्य नमस्कार घाला.

८. दिवसातून 3 वेळा जेवन करा. तसेच 6 वेळा थोडा-थोडा नाश्ता घ्या. 

९. अश्वगंदाचे मुळं ही कुटून त्याची बारीक पाऊडर करून एका बाटलीत भरून ठेवा. रोज रात्री झोपण्यापूर्वी 2 चमचे पावडर गाईच्या दुधासोबत घ्या.  

१०. कॅलशिअम आणि प्रोटीनयुक्त आहार घ्या. फळे, पाले भाज्या यांचा आहारात समावेश करा. याचं नियमित सेवन करा.