मुंबई : हिवाळ्यात ओठ फाटणे, कोरडे पडणे यासारख्या समस्या उद्भवतात. तेही आपल्याला आवडत नाही पण जर ओठ काळे पडले असतील तर ते किती खराब दिसतात. लिपस्टीकच्या जास्त प्रमाणात लावल्यामुळे ओठ काळे पडतात.
काळ्या ओठांवर हे आहेत घरगुती उपाय :
१. रात्री झोपतांना गायीच्या दुधाच्या लोणीत केसर मिसळा आणि ते ओठांना लावा. ओठ काळे पडले असतील तर फायदा होईल.
२. झोपण्यापूर्वी बदामाचं तेल ओठांवर लावा. ओठांचा रंग उजळण्यास मदत होईल.
३. मलईमध्ये चिमुटभर हळद टाकून ओठांची मालिश केल्यास ओठांचा कोरडेपणा दूर होतो.
४. रोज कमीतकमी जास्तीत जास्त पाणी प्या. त्यामुळे ओठ काळे आणि कोरडे पडत नाही.
५. बीटचा रस ओठांवर लावल्याने लिपस्टीक लावण्याची गरज पडणार नाही. रोज काकडीचा रस लावल्यानेही फरक पडतो.