मुंबई : हल्ली सर्वच पदार्थ मार्केटमध्ये रेडिमेड मिळतात. मात्र ते आरोग्यासाठी चांगले असतातच असे नाही. चांगल्या आरोग्यासाठी हे सात पदार्थ खाणे टाळल्यास तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
फ्रुट ज्यूस - फळांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्वे, फायबर असतात. मात्र कृत्रिम फ्रुट ज्यूसमध्ये केवळ साखरेचे पाणी असते. ज्याचा शरीराला काहीही फायदा होत नाही.
पॉलिश तांदूळ - पॉलिश केलेला तांदूळ खाण्यापेक्षा हातसडीच्या तांदळाचा भात खावा. पॉलिश केलेल्या तांदळामधून आवश्यक पोषणतत्त्वे निघून जातात.
व्हाईट ब्रेड - सकाळी नाश्त्यामध्ये बहुतेकांच्या घरात ब्रेड असतो. मात्र हा व्हाईट ब्रेड शरीरासाठी योग्य नाही. त्याऐवजी ब्राऊन ब्रेड खावा.
तेलकट पदार्थ - जितके शक्य होईल तितके तेलकट पदार्थ खाणे टाळावे. यामुळे केवळ शरीरात फॅटच जमा होत नाही तर कोलेस्टेरॉलही वाढते.
क्रीमी सॅलड ड्रेसिंग - हल्ली डाएट फूड म्हटल्यावर सॅलडला अधिक प्राधान्य दिले जाते. मात्र हे सॅलड म्हणजे कच्च्या भाज्या असाव्यात. त्यात क्रीम नसावे.
फ्रोझन फूड - हल्ली फ्रीजमधून डायरेक्ट कढईत असे अनेक पदार्थ बाजारात मिळतात. मात्र हे फ्रोजन पदार्थ आरोग्यासाठी घातक आहेत.