मुंबई: कोमट पाणी शरीरासाठी अतिशय उपयुक्त आहे. हार्ट अॅटॅकपासून गरम पाणी प्यायल्यानं फायदा मिळतो. चीन आणि जपानमध्ये तर जेवणासोबत गरम चहा पितात, पण थंड पाणी पिणं टाळतात.
आणखी वाचा - केस अधिक गळत असतील तर करा कढी पत्त्याचे हे उपाय!
काहीही खाल्ल्यानंतर थंड पाणी प्यायल्यानं आपल्या पोटातील अन्न पचविणारा अग्नी शांत होतो. अन्नातील तैलिय पदार्थ गोठतात. त्यामुळं पचनक्रिया मंदावते आणि जेव्हा पोटातील हा गाळ अॅसिडसोबत रिअॅक्ट होतो तेव्हा तो आतड्यांकडून शोषून घेतला जातो. त्यामुळं आतड्यांमधील फॅट्सचं प्राण वाढत जातं. त्यामुळं जेवतांना किंवा जेवल्यानंतर कोमट पाणी, गरम सूप प्यावं.
फ्रेंच फ्राइस आणि बर्गर
फ्रेंच फ्राइस आणि बर्गर हे हृदयाचे सर्वात मोठे शत्रू त्यावर शीतपेय पिल्यानं खूप धोका. आपल्या चांगल्या आरोग्यासाठी ही सवय बंद करा.
आणखी वाचा - चणे खाण्याचे फायदे ओळखून तुम्हीही व्हाल हैराण!
झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट पाणी प्यावं, त्यामुळं रक्तप्रवाह नीट राहतो आणि हार्ट अॅटॅकची भिती कमी होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.