मुंबई : आपल्या लहानग्या मुलांसोबत वेळ मिळाला की तुम्हीही आनंदानं त्यांना दंडांना उचलून झोका खेळवता का? असाल तर थांबा...
कदाचित यामुळे लहानग्यांना मजा वाटत असेल पण हे त्यांच्या शरीरासाठी खूपच धोकादायक ठरू शकतं.
मुलांना दंडांना धरून गोल गोल फिरवल्यानं किंवा उचलल्यानं त्यांच्या खांद्याच्या स्नायूंना इजा पोहचू शकते.
एक ते चार वर्षांपर्यंतच्या चिरमुरड्यांचे स्नायूबंध पूर्णत: विकसित झालेले नसतात... हाडांच्या बाबतीततही तेच... त्यामुळे, त्यांच्या हातांना किंवा दंडांना धरून तुम्ही त्यांना झोका देण्याचा प्रयत्न केला तर त्यांना 'पुल्ड एल्बो' किंवा 'नर्समॅड'सारख्या आजारांना सामोरं जायला लागू शकतं.