मुंबई : सध्या जगभरात दरवर्षाला तब्बल १ कोटीहून अधिक लोकांचा मृत्यू हार्ट अॅटॅकने होतो. व्यस्त जीवनशैली, पोषक आहाराचा अभाव, व्यायामाचा अभाव, लठ्ठपणा, धूम्रपान या सवयींमुळे हार्ट अॅटॅकचा धोका अधिक वाढतो. लहान वयातही हार्ट अॅटॅकने मृत्यू झाल्याच्या घटना घडतायत.
धूम्रपान - धूम्रपानाच्या सवयीमुळे हार्ट अॅटॅकचा धोका वाढण्याची शक्यता अधिक असते. तसेच धूम्रपानासोबत ज्यांना मोठ्या प्रमाणात अल्कोहोल घेण्याची सवय असते त्यांनाही हार्ट अॅटॅकचा धोका अधिक असतो.
अपुरे पोषण - हल्लीच्या व्यस्त जीवनशैलीमुळे पोषक आहार घेणे कठीण झालेय. हार्ट अॅटॅकचा धोका वाढवण्यामागे हेही एक कारण बनलेय.
व्यायामाचा अभाव - चांगल्या आरोग्यासाठी नियमित व्यायाम गरजेचा असतो. मात्र वेळेच्या अभावी व्यायाम केला जात नाही. यामुळेच लठ्ठपणा वाढतो. हे कारणही हार्ट अॅटॅकला कारणीभूत ठरु शकते.
उच्च रक्तदाब - उच्च रक्तदाबाचा त्रास असल्यास हार्ट अॅटॅकचा धोका वाढतो. रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी योग्य आहार, नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. त्यासोबत धूम्रपान, तसेच ड्रिंकिगही टाळले पाहिजे.