मुंबई : दिवसभरात तुम्ही किती पाणी पितात आणि त्यामुळे तुमच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो, याची माहिती करून घेणे आवश्यक आहे. पहाटे उठल्यावर एक ग्लासभर पाणी पिणं कधीही योग्य असल्याचं सांगितलं जातं, यामुळे तुमची त्वचा कोरडी पडत नाही.
सकाळी कोमट पाणी पिल्याचाही फायदा होतो, त्यात मध किंवा लिंबू टाकून पिल्यास शरीरातील टॉक्सिक एलिमेंट बाहेर टाकण्यास मदत होत असते, अतिशय जास्त प्रमाणात पाणी पिल्यास आरोग्याला धोकादायक असते, पण जास्त प्रमाणात कमी पाणी पिल्याने आरोग्याच्या तक्रारी वाढल्याची उदाहरण आहेत.
कोमट पाणी, लिंबू पाणी पिल्याने एनर्जीची लेव्हल वाढते आणि पचन क्रिया उत्तम राहण्यास मदत होते. पाणी पिल्याने शरीरातील जळजळ होण्याचे प्रमाण कमी होते.
कोमट पाणी पिल्यास पित्त आणि कफ दोष होत नाही. जेवणानंतर लगेच पाणी पिणे टाळावे, पाणी लगेच पिल्यास जेवण पचण्यास वेळ लागतो, काकडी, खरबूज आणि आयस्क्रीम खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये, सर्दी होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. जेवणानंतर लगेच पाणी प्यायल्याने फॅट वाढतात.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.