तुम्हाला कोणता 'हेअर कलर' चांगला दिसेल?

केस रंगवण्याचं प्रमाण अलीकडे खूप वाढलंय, आपल्या केसांचं काहीतरी करावं, असं अनेकांना कधीही वाटू शकतं. पण हेअर कलर कसे करावेत हा खरा प्रश्न आहे, कारण अनेक वेळा साजेसा हेअर कलर न केल्याने ते व्यवस्थित दिसतं नाही, आणि पैसे जातात आणि आपलं हसं देखिल होतं, म्हणून पूर्ण केस कलर करावेत, हाय लाईटनिंग करावं असे अनेक प्रश्न समोर उभे राहतात.

Updated: May 5, 2015, 12:43 PM IST
तुम्हाला कोणता 'हेअर कलर' चांगला दिसेल? title=

मुंबई : केस रंगवण्याचं प्रमाण अलीकडे खूप वाढलंय, आपल्या केसांचं काहीतरी करावं, असं अनेकांना कधीही वाटू शकतं. पण हेअर कलर कसे करावेत हा खरा प्रश्न आहे, कारण अनेक वेळा साजेसा हेअर कलर न केल्याने ते व्यवस्थित दिसतं नाही, आणि पैसे जातात आणि आपलं हसं देखिल होतं, म्हणून पूर्ण केस कलर करावेत, हाय लाईटनिंग करावं असे अनेक प्रश्न समोर उभे राहतात.

हेअर कलर करणार असाल, तर तुमचा हेअर कलर निवडताना या काही गोष्टी नक्की लक्षात ठेवा, तेव्हाच तुमचा हेअर कलर नक्की परफेक्ट दिसेल!

व्यक्तिमत्वाचा विचार करा
तुमचा चेहरा कसाय, त्याचा आकार कसा आहे त्यानुसार कलर निवडायला हवा आणि त्याही आधी तुमचं व्यक्तिमत्त्व कसंय, तुम्ही काय काम करता, हे सुद्धा महत्त्वाचं. त्यानुसार रंग निवडा.  
अनेक जण फॅशन कुठल्या रंगाची आहे ते पाहून रंग लावून घेतात. मात्र ट्रेण्ड प्रमाणं जाऊ नका, तुम्हाला कलर का करायचाय आणि कुठला रंग तुमच्या व्यक्तिमत्त्वाला उठाव देईन, हे तपासा. त्यासाठी कलर करणार्‍या एक्सपर्टशी बोला.

सेलिब्रिटींचा नाद टाळा
सेलिब्रिटी लावतात तेच कलर लावायचे असं अनेकांना वाटतं. ते कलर स्क्रिनवर चांगले दिसतात. प्रत्यक्षात चांगले दिसतीलच, असं नाही. असे कलर फार बोल्ड असतात. आपण लावले तर भयानक दिसू शकतात. इंडियन स्किनसाठी खरं तर चेस्टनट कलर आणि डार्क चॉकलेट शेडचे मिक्स हा कलर चांगला दिसतो. तो फॅशनेबलही आहेच.

रंग जर काळासावळा असेल?
तुमचा रंग जर काळासावळा असेल, तर तुमच्या केसांची टोकं कलर करा.
भारतीय त्वचारंगाबरोबर फायरी रेड, कॉपर रेड, पर्पल या रंगांच्या शेड्स हायलाईट्ससाठी उत्तम दिसतात. स्ट्रिक्स, बन्र्ट हायलाईट्स या शेड्सनी करावं.

एकदमच गोरा रंग असेल तर?
तुम्ही एकदम गोरेच असाल तर चॉकलेट, कॉपर ब्राऊन, हनी ब्लॉण्ड, खाकी ब्राऊन या रंगांच्या शेड्स वापराव्यात.
ज्यांचे ७0 टक्के केस पांढरे झालेले आहेत, त्यांनी हायलायलाईट्स करू नयेत. मात्र ज्यांना थोडा फॅशनेबल टच द्यायचाय त्यांनी ब्राऊन रंगाच्या शेड्स वापरून थोडंसं हायलायटिंग करावं. ते रंग सूर्यप्रकाशात चकाकतात, चांगले दिसतात.
         
गोऱ्या रंगाच्या लोकांसाठी?
गोर्‍या रंगाच्या व्यक्तींना स्ट्रिक्स करायच्या असतील, तर स्पायसी रेड, ब्ल्यू, सन गोल्ड या रंगांच्या फ्रण्ट स्ट्रिक्स, बॉटम हायलाईट्स कराव्यात.

सावळ्या रंगासाठी?       
सावळ्या रंगासाठी ग्लोबल कलर्स, महागनी, कॉफी, कॅरॅमल शेड्स स्ट्रिक्स मस्त दिसतात.

हेअर कलर तर उत्तम कराल पण त्यानंतर त्याची काळजी घेणं फार महत्त्वाचं. उत्तम कलर प्रोटेक्टिंग शॅम्पू  आणि कंडिशनर वापरा. दर २५ दिवसांनी एकदा सलूनमधे जाऊन हेअर स्पा करून घ्यायला हवं, तरच हेअर कलर चांगले टिकतात. हेअर कलर करतायत पण पैसे गेले तरी चालेल, पण सुरक्षित रंग निवडा, ते तुमच्या आरोग्यासाठी हानीकारक तर नाहीत ना याचा देखिल विचार झाला पाहिजे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.