नवी दिल्ली : तरुण महिलांनी आठवड्यातून कमीत कमी एका चने आणि गूळ खाण्याचा सल्ला दिलाय इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आयएमए) महासचिव डॉ. के. के. अग्रवाल यांनी...
गूळ हा लोहाचा (आयर्न) समृद्ध स्त्रोत आहे... तर चन्यात मोठ्या प्रमाणात प्रोटीन आढळतं. यामुळे, मासिक स्रावातून झालेल्या रक्ताचं नुकसानं लवकर भरून निघण्यास मदत होते.
ऑल इंडिया विमेन कॉन्फरन्सद्वारे आयोजित एका व्याख्यानात डॉ. अग्रवाल यांनी सर्व महिलांनी येणाऱ्या माघ महिन्यात दररजो कमीत कमी ४०-६० मिनिटं उन्हात बसायला हवं... तसंच तिळाचे लाडू किंवा चने-गूळ खायला हवं... यामध्ये कॅल्शिअमचं प्रमाण जास्त असतं. यामुळे, त्यांच्या शरीरात कॅल्शिअम आणि विटॅमिन डीची कमतरता भरून निघते.
मूळातच भारतीयांमध्ये विटॅमिन 'डी'चं प्रमाण कमी असतं, असं डॉ. अग्रवाल, डॉ. अंबरीश मित्तल आणि डॉ. अल्का कृपालानी यांनी एका संयुक्त वक्तव्यात म्हटलंय. ही कमतरता भरून निघण्यासाठी सर्व भारतीयांनी दररोज ४० मिनिटं उन्हात बसायला हवं. या दरम्यान त्यांच्या शरीराचा ४० टक्के भाग उघडा असायला हवा... ही प्रक्रिया त्यांनी कमीत कमी ४० दिवस सुरू ठेवायला हवी, असा सल्ला दिलाय.
जर, या नैसर्गिक पद्धती वेळेच्या कारणास्तव अशक्य वाटत असतील तर त्यांनी प्रत्येक महिन्याला विटॅमिन डी सॅशे घ्यायला हवेत ज्यामध्ये ६०,००० यूनिट विटॅमिन डी-३ असायला हवं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.