सलमान खानने केले ५७ जणांचे खून!

२६ वर्षांच्या सलमान खानने आतापर्यंत ५७ जणांचा बळी घेतला असल्याचे चौकशीत समोर आल्यानंतर चौकशी करणाऱ्या पथकाला धक्काच बसला. एखादा दरोडा टाकायचा असल्यास खून करावा लागतो आणि खून केल्याशिवाय दरोडा पूर्ण होत नाही, हे या २६ वर्षीय सलमान खानचे म्हणणे ऐकल्यावर उत्तर प्रदेश पोलिसांची झोप उडाली.

Updated: Jul 6, 2015, 05:45 PM IST
सलमान खानने केले ५७ जणांचे खून! title=

बरेली : २६ वर्षांच्या सलमान खानने आतापर्यंत ५७ जणांचा बळी घेतला असल्याचे चौकशीत समोर आल्यानंतर चौकशी करणाऱ्या पथकाला धक्काच बसला. एखादा दरोडा टाकायचा असल्यास खून करावा लागतो आणि खून केल्याशिवाय दरोडा पूर्ण होत नाही, हे या २६ वर्षीय सलमान खानचे म्हणणे ऐकल्यावर उत्तर प्रदेश पोलिसांची झोप उडाली.

गेल्या दहा वर्षात सलमान खानने रोहिलखंड परिसरातील ५७ जणांचा बळी घेतला आहे. वयाच्या १६ व्या वर्षी पहिला खून करणारा सलमान आता उत्तर प्रदेशच्या रोहीलखंड भागातील 'चायमार' टोळीचा सूत्रधार बनलाय. पन्नासहून अधिक खूनांच्या कबुलीमुळे सलमान हा गेल्या कित्येक वर्षांत पोलिसांच्या हाती लागलेला भारतातील सर्वांत धोकादायक 'सिरीयल किलर' ठरला आहे.

यापूर्वी, १९व्या शतकात बेहराम सिंह नावाच्या ठगाचे खून सत्र इंग्रज सरकारसाठी डोकेदुखी ठरले होते. दिल्ली ते ग्वाल्हेर आणि जबलपूरपर्यंतच्या भागात बेहराम सिंहच्या टोळीने धुमाकूळ घातला होता. बेहराम सिंहने एकट्याने जवळपास २०० तर त्याच्या सहकाऱ्यांनी सुमारे ९०० निष्पाप नागरिकांची हत्या केली होती, असे सांगितले जाते. 

रोहीलखंडमधील बरेली, बदाऊँ, पिलीभित, कन्नौज, शहाजहाँपूर, कानपूर किंवा हरदोई यापैकी कुठल्याही जिल्ह्याचे नाव घ्या, सलमान तिथे केलेल्या गुन्ह्यांबाबत अगदी सहजपणे माहिती देतो,' असे बरेलीचे सर्कल इन्सपेक्टर असित श्रीवास्तव यांनी सांगितले. गुन्ह्यांची माहिती देतानाचा सलमानचा थंडपणासुद्धा पोलिसांसाठी नवे प्रश्न उभे करतो आहे. कारण इ‌तक्या निर्ढावलेल्या गुन्हेगारांकडून हवी ती माहिती काढून घेणे अत्यंत कठीण काम असते.

 'दरोड्याच्या वेळी विरोध करणाऱ्याच नव्हे तर उपस्थित असलेल्या व्यक्तींचाही खून करायचा. नंतर घरातील पैसे आणि इतर मौल्यवान वस्तू घेऊन जायचे, अशी सलमानच्या टोळीची कार्यपद्धती आहे,' असे श्रीवास्तव यांनी सांगितले. पन्नासहून अधिक गुन्हे करणाऱ्या सलमानने त्याच्या कबुलीजबाबादरम्यान एकदाही पश्चाताप व्यक्त केला नाही, असे श्रीवास्तव म्हणाले.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.