त्याने 53 लाखांच्या कारला गाढवं जुंपली

अहमदाबादमध्ये एकाने 53 लाखांच्या जॅग्वार कारला गाढवं जुंपली आणि ओढत सर्व्हिस स्टेशनसमोर प्रदर्शन केलं.

Updated: Jun 10, 2014, 11:14 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, अहमदाबाद
अहमदाबादमध्ये एकाने 53 लाखांच्या जॅग्वार कारला गाढवं जुंपली आणि ओढत सर्व्हिस स्टेशनसमोर प्रदर्शन केलं.
अहमदाबादच्या असलाली कार्गो मोटर्स सर्व्हिस स्टेशनबाहेर लोकांनी हे दृश्य आपल्या कॅमेरात कैद केलं.
कारचा मालक राहुल ठाकरने ही कार बेकार असल्याचं सांगितलं. या कारने दिलेल्या त्रास असह्य झाल्यानंतर आपण हे प्रदर्शन केल्याचं त्याने सांगितलं.
ही कार म्हणजे नुसता पत्र्याचा डबा असल्याचं राहुल ठाकर म्हणतो, जेव्हा पासून ही कारमी घेतली आहे. एका दिवसाआड काहीना काही अडचण जरूर येतेय.
ही कार कधीही व्यवस्थित चालली नाही. रिपेअरिंगसाठी मी सर्व्हिस स्टेशनच्या अनेक चकरा मारल्या. मी 7 मे रोजी ही कार खरेदी केली, तेव्हापासून या अडचणी येत असल्याचं राहुल ठाकर सांगतो.
एकदा या गाडीचा लाईट खराब झाला. तेव्हा ते म्हणाले लाईटचा स्टॉक नाही, मी संतापल्यावर लाईट व्यवस्थित केला. एकदा बंपर डॅमेज झाला, त्यांनी 2 दिवसांची वेळ मागितली आणि कार 10 दिवसांनी परत केली, असं राहुल ठाकरने सांगितलं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.