पाटणा : बिहारमध्ये दहावीच्या परीक्षेत कॉपी करणाऱ्या आणि कॉपीचा प्रयत्न करणाऱ्या एकूण ९०० विद्यार्थी आणि पालकांना अटक करण्यात आली आहे.
कॉपी प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कॉपीबहाद्दरांना धडा शिकवण्यासाठी पाटणा हायकोर्टाने कठोर पावलं उचलण्याचे आदेश दिले होते.
आतापर्यंत कॉपी करणाऱ्या ७६६ विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकलं आहे. ज्या परीक्षा केंद्रांवर कॉपी झाल्याचे वृत्त मीडियाने दाखवलं होतं तिथली परीक्षा रद्द करण्यात आली आहे.
कॉपी करणाऱ्या ५५१ विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांकडून एकूण १३ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. कारवाई करण्यात आलेल्या ९०० जणांमध्ये विद्यार्थी, त्यांचे पालक आणि नातेवाईक तसेच सहकाऱ्यांचा समावेश आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.