www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
‘आम आदमी पार्टी’चे प्रमुख अरविंद केजरीवाल हे लवकरच दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार, हे आता पक्क झालंय. ‘आप’च्या या पहिल्या-वहिल्या दिल्ली सरकारमध्ये ज्येष्ठ नेते मनीष शिसोदिया यांच्यासह सहा मंत्रीही पद व गोपनीयतेची शपथ घेणार असल्याचं समजतंय.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या आठवड्यात होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात केजरीवाल यांच्यासोबतच हे नेतेदेखील शपथ घेणार आहेत. शपथविधी सोहळ्यानंतर विभागाचं वाटप करण्यात येईल, असं समजतंय.
केजरीवाल यांच्या या मंत्रिमंडळात पटपडगंज विधानसभेतून विजय प्राप्त करणारे माजी पत्रकार मनिष सिसोदिया यांच्याशिवाय राखी बिडला, सोमनाथ भारती, सौरभ भारद्वाज, गिरीश सोनी आणि सतेंद्र जैन यांचा समावेश आहे. केजरीवाल यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर भारद्वाज यांनी ही माहिती दिलीय.
परंतु, सूत्रांच्या माहितीनुसार टीमसंबंधी अंतिम निर्णयात परिस्थितीनुसार बदल होण्याची शक्यता आहे. केजरीवाल यांनी आज पूर्ण दिवस सिसोदिया यांच्यासहीत पक्षातील अन्य नेत्यांशी यासंबंधी आपल्या निवासस्थानी याबद्दल चर्चा केली.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.