मुंबई : भारतातील वाढती लोकसंख्या रोखण्याच्या दृष्टीने सरकार नेहमीच महत्वाचे निर्णय घेत असते. आसाममध्येही आता लोकसंख्ये रोखण्याच्या दृष्टीने पाऊले उचलली जात आहेत.
दोन पेक्षा जास्त मुलं असलेल्या व्यक्तीला सरकारी नोकरी देण्यात येऊ नये असा प्रस्ताव आसाम सरकारने ठेवलाय. आसाम सरकारने रविवारी जनसंख्या निती मसुद्याची घोषणा केली.
या मसुद्यानुसार दोनपेक्षा अधिक मुले असलेल्या व्यक्तीला सरकारी नोकरी देण्यात येऊ नये तसेच मुलींना युनिर्व्हसिटीपर्यंतचे शिक्षण मोफत दिले जावे.
त्याचप्रमाणे नोकरीत रुजू झाल्यानंतरही त्या व्यक्तीस या नियमाचे पालन करावे लागेल, असे आसामचे आरोग्यमंत्री हिमंत विश्व शर्मा यांनी सांगितले. पंचायतसमिती, जिल्हापरीषद निवडणूका लढवणाऱ्या उमेदवारांनाही हा नियम लागू असेल.