नवी दिल्ली : आज नरेंद्र मोदी सरकारनं एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केलाय. मोदी सरकारनं थेट परकीय गुंतवणुकीच्या (एफडीआय) मर्यादेत वाढ केलीय.
परदेशी गुंचवणूक वाढवण्यासाठी केंद्र सरकारनं महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. डिजीटल इंडियासाठी निधीची गरज असल्याचं यावेळी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलंय. तब्बल 15 क्षेत्रांमध्ये परदेशी गुंतवणुकीबाबत बदलांना केंद्रानं मंजुरी दिलीय.
उल्लेखनीय म्हणजे, संरक्षण क्षेत्रात तब्बल 49 ट्क्के परदेशी गुंतवणुकीला मान्यता देण्यात आलीय. तर न्यूज चॅनल्समधील परदेशी गुंतवणुकीचे प्रमाण 26 टक्क्यांवरून 49 टक्क्यांवर नेण्यात आलंय. मनोरंजन वाहिन्यांमध्ये 100 टक्के परदेशी गुंतवणुकीला मंजुरी देण्यात आलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.