इंफाळ : भाजपने मणिपूरमध्ये बहुमत सिद्ध केलं आहे. भाजपचे एन बिरेन सिंह यांनी १६ मार्च रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. भाजपला ३३ सदस्यांनी पाठिंबा दिला. मणिपूर विधानसभेत ६० सदस्यसंख्या आहे.
मणिपूरमध्ये पहिल्यांदाच भाजप सरकार स्थापन झालं आहे. एक अपक्ष आणि तृणमूल काँग्रेसच्या एका आमदारानेही भाजपला पाठिंबा दिला.भाजपचे यमनम खेमचंद यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
भाजपने विधानसभा निवडणुकीत २१ जागांवर विजय मिळवला होता. तर काँग्रेस २८ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र भाजपने अन्य पक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन केली.
मंत्रिमंडळात मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांच्यासह भाजपच्या २ आमदारांना मंत्रिपद देण्यात आलं आहे. तर एनपीपी ४, एनपीएफ, एलजेपी प्रत्येकी १ आणि काँग्रेस सोडून भाजपमध्ये आलेल्या एका आमदाराला मंत्रिपद दिलं आहे.