नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेत भाजप आमदार विजेंद्र गुप्ता चक्क बाकावरच उभे राहिलेत. यामुळे विधानसभेत थोडासा गोंधळ उडाला.
दिल्ली विधानसभेत टॅंकर घोटाळ्यावर चर्चा सुरू होती. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजप आणि काँग्रेसमध्ये पती-पत्नीचे नाते असल्याचा आरोप केला. यावेळी विरोधी पक्षनेता असलेले गुप्ता यांना बोलण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे गुप्ता चक्क बाकावरच उभे राहिले. यामुळे सर्वांचे लक्ष वेधले.
WATCH: BJP's Vijender Gupta stand on a bench to protest against Delhi Govt inside State Assemblyhttps://t.co/fY9FQyEzI0
— ANI (@ANI_news) June 10, 2016
विधानसभा अध्यक्षांनी वारंवार विनवणी केल्यानंतर गुप्ता बाकावरून खाली उतरले आणि पुन्हा सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात झाली.