नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशावर कारवाई करण्यासाठी संकेत दिल्यानंतर आता देशातील 600 ज्वेलर्सवर कारवाई होण्याची शक्यता आहे. 25 शहरांतील सोने विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी माहिती आयकर विभागने मागिवली आहे.
काळा पैसा थांबविण्यासाठी आणि तो बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्या आहेत. त्यामुळे अनेकांना याचा धक्का बसला आहे. आता सोने व्यापाऱ्यांवर आयकर विभागाची करडी नरज राहणार आहे. दिल्लीसह मुंबई आदी 25 शहरांतील 600 सोने व्यापाऱ्यांची माहिती मागवली आहे. काही ठिकाणी इन्कम टॅक्सने छापा मारला होता.
गुरुवारी आयकर विभागाने दिल्लीत चांदनी चौक, मुंबईत तीन ठिकाणी आणि चंदीगढ, लुधियाना यांच्याबरोबर अन्य शहरात अवैध पद्धतीने नोटा बदलने आणि हवालाचा व्यावसाय होत असल्याच्या शक्यतेने हे छापे मारले होते. दक्षिण भारतातही दोन शहरात छापे टाकण्यात आले होते.
500 आणि 1000च्या नोटा रद्द झाल्यानंतर काही व्यापाऱ्यांनी बदलण्यासाठी काही पैसै घेतले तर काहींनी कर चुकविण्यासाठी सोन्यात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. त्यामुळे चोरी.