भोपाळ : बैठकीदरम्यान पॉर्न पाहणाऱ्या भोपाळ म्युनिसिपल कॉर्पोरेशन (बीएमसी)च्या अधिकाऱ्याला तातडीने निलंबित करण्यात आल्याची घटना घडलीये.
भोपाळचे महापौर आलोक शर्मा यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीदरम्यान ही घटना घडलीये. या बैठकीत चर्चा करण्याऐवजी येथील एक अधिकारी पॉर्न पाहत होता. या अधिकाऱ्याला लगेगच निलंबित करण्यात आलेय.
भोपाळच्या लोकांनी आम्हाला कामासाठी निवडून दिलेय. शहरातील समस्यांबाबत चर्चेसाठी बैठक बोलावली होती. या बैठकीदरम्यान बीएमसीचे एक विभागीय अधिकारी पॉर्न पाहत होते. या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती शर्मा यांनी एएनआयला दिलीय.या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आलेत.