अमृतसर : फेसबुकवरची मैत्री किती खरी किती खोटी, कोण-कोणत्या अपेक्षा करेल, हे कुणीही सांगू शकत नाही, सोशल नेटवर्किंगमध्ये सातासमुद्रापार जाऊन विवाह जुळतात खरे, पण मानसिकता तिच असते आणि अशा मानसिकतेमुळे अनेकांना त्रास होतो.
फेसबुकवर प्रेम जुळल्यानंतर पंजाबच्या एका मुलीनं न्यूझीलंडमध्ये असलेल्या एका एनआरआयशी विवाहाचा निर्णय घेतला छहर्टा गावात ताज पॅलेस या हॉटेलमध्ये हा विवाह १४ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला.
नवरदेव भुपिंद्रकुमार मंडपात आला, वधूजवळ कानात काहीतरी पुटपुटला तेव्हा, वधूने हमसून हमसून रडण्यास सुरूवात केली. ती का रडतेय याचा शोध मुलीकडच्या वऱ्हाडी मंडळीने घेतला आणि सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला.
ही सर्व परिस्थिती पाहून नवरदेवानेही मंडपातून धूम ठोकली. वधूला हे सर्व सहन न झाल्याने ती देखिल जागच्या जागी चक्कर येऊन पडली.
नवरदेव नेमका कानात काय पुट-पुटला असावा याचं उत्तर वधूनेच दिलं, वधूने दिलेल्या माहितीनुसार नवरदेवाने आपल्याकडून पाच लाख रूपयांची मागणी केली. तेव्हाच आपण लग्न करू असं सांगितलं, मात्र त्याचवेळी वधूने त्याला थेट लग्नासाठीच नकार देऊन टाकल्याने नवरदेवानेही वऱ्हाडासह तेथून काढता पाय घेतला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.