अमृतसर : पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग दुसऱ्यादा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. पंजाबचे २६वे मुख्यमंत्री म्हणून कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी शपथ घेतली. अमरिंदर यांच्यासोबत ७ कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्रीसुद्धा शपथ घेतली. गुरजितसिंग औजाला, मनप्रीतसिंग बादल, चरणजीतसिंग छन्नी यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
नवज्योत सिंग सिद्धू यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलं आहे. सिद्धू यांना उपमुख्यमंत्रीपद दिलं जाण्याची शक्यता असल्याची चर्चा होती. मात्र अमरिंदर सिंग यांनी नकार दिल्याने सिद्धूचं स्वप्न भंगलं. सिद्धू अमृतसर पूर्वमधून निवडणूक जिंकलेत. या शपथविधी सोहळ्याला काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह दिग्गज काँग्रेस नेत्यांनी उपस्थिती लावली.