हेराल्ड प्रकरण: सोनिया आणि राहुल गांधींविरुद्ध कोर्टाचं समन्स

दिल्लीतील पटियाला कोर्टानं आज सोनिया गांधी आणि राहुल गांधींना समन्स बजावलंय. नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राच्या आर्थिक बाबतीतील अनियमिततेबाबतचं हे प्रकरण आहे. हे वृत्तपत्र काही वर्षांपूर्वी बंद झालंय. 

Updated: Jun 26, 2014, 04:18 PM IST
हेराल्ड प्रकरण: सोनिया आणि राहुल गांधींविरुद्ध कोर्टाचं समन्स title=

नई दिल्ली: दिल्लीतील पटियाला कोर्टानं आज सोनिया गांधी आणि राहुल गांधींना समन्स बजावलंय. नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राच्या आर्थिक बाबतीतील अनियमिततेबाबतचं हे प्रकरण आहे. हे वृत्तपत्र काही वर्षांपूर्वी बंद झालंय. 

सुब्रमण्यम स्वामींनी सोनिया-राहुल गांधींवर 2000 कोटी रुपयांची संपत्ती बळकावल्याचा आरोप लावलाय. स्वामींनी आरोप लावलाय की, काँग्रेस पक्षाची संपत्ती आपल्या खाजगी प्रॉपर्टीवर यांनी लावलाय. याप्रकरणी सोनिया आणि राहुल गांधींना ट्रायलचा सामना करावा लागेल. कोर्टानं त्यांना 7 ऑगस्टला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. सोनिया आणि राहुल गांधीसोबत आणखी पाच जणांच्या नावे कोर्टानं समन्स जारी केलाय. 

हा समन्स कोर्टानं भाजपाचे नेते सुब्रमण्यम स्वामींच्या खाजगी तक्रारीवर जारी केलाय. नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राची स्थापना 1938मध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केली होती.  हे वृत्तपत्र 2008मध्ये बंद झालं. नंतर मग हेराल्ड हाऊसला पासपोर्ट ऑफिससाठी भाड्यानं दिलं गेलं. मात्र सुब्रमण्यम स्वामींचा आरोप आहे की, हेराल्ड हाऊसचा वापर पब्लिशिंग हाऊस म्हणून केला जातोय. स्वामींची मागणी आहे की, सोनिया आणि राहुल गांधींचं पासपोर्ट जप्त करण्यात यावं म्हणजे त्यांच्या परदेश जाण्यावर बंधन येईल. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.