हुश्श... गॅस दरवाढीचा फटका आत्ताच नाही!

Updated: Jun 26, 2014, 02:46 PM IST
हुश्श... गॅस दरवाढीचा फटका आत्ताच नाही!   title=

 

नवी दिल्ली : रेल्वे तिकिटांच्या दरवाढीनंतर गॅस दरवाढीचाही चटका सहन करावा लागतो की काय? अशा विवंचनेत असणाऱ्या नागरिकांना केंद्र सरकारनं तीन महिन्यांचा पोकळ दिलासा दिलाय.

केंद्रीय तेल आणि प्राकृतिक गॅस मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारनं घरगुती गॅसच्या किंमतीत पुढचे तीन महिने वाढ न करण्याचा निर्णय घेतलाय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक प्रकरणांसाठी नेमलेल्या मंत्रीमंडळीय समितीच्या (सीसीईए) बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी व्यापक विचार विनमय करण्याची गरज असल्याचं प्रधान यांनी म्हटलंय.

सबसिडीचं ओझं कमी करण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकार डीझेलप्रमाणेच घरगुती गॅसचे दरही दर महिन्याला थोडे थोडे करून वाढवणार असल्याची चर्चा सुरू होती. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.