पणजी : भारताचे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर लवकचर निवृ्त्त होण्याची शक्यता आहे. गोव्यातील म्हापसा येथील रविवारी एका कार्यक्रमादरम्यान पर्रिकर यांनी असे संकेतही दिले.
'६० वर्षानंतर माणसाने आपल्या निवृत्तीबाबत विचार करायला हवा. १३ डिसेंबरला मी ६० वर्षांचा होतोय. हे पाहता गेल्या दोन-तीन वर्षांपासून मी याबाबत विचार सुरु केला होता. मोठी जबाबदारी घेण्यात आता कोणताही रस नसल्याचे पर्रिकर यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, निवृत्तीनंतर गोव्याच्या राजकारणावर लक्ष देणार. जर राज्य सरकार चुकीच्या मार्गावर जात असेल तर मी योग्य मार्ग दाखवेन असेही पर्रिकर म्हणाले. २०१२ मध्ये पर्रिकर यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा हाती घेतली होती. त्यानंतर गेल्या वर्षी त्यांना संरक्षण मंत्रीपद देण्यात आले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.