पीएफ धारकांना ५० हजार रुपयांचा ‘लॉयल्टी-कम-लाइफ’ लाभ

सलग २० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त काळ योगदान देणाऱ्या सदस्यांना भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) निवृत्तीच्या वेळी ५० हजार रुपयांचा ‘लॉयल्टी-कम-लाइफ’ लाभ देणार आहे. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 14, 2017, 11:52 AM IST
पीएफ धारकांना ५० हजार रुपयांचा ‘लॉयल्टी-कम-लाइफ’ लाभ title=

नवी दिल्ली : सलग २० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त काळ योगदान देणाऱ्या सदस्यांना भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) निवृत्तीच्या वेळी ५० हजार रुपयांचा ‘लॉयल्टी-कम-लाइफ’ लाभ देणार आहे. 

एखाद्या कर्मचारी सभासदाला २० वर्षांच्या खाते कालावधीत कायमचे अपंगत्व आल्यास ‘लॉयल्टी-कम-लाइफ’ (बांधिलकी रक्कम) पूर्ण देण्यात येईल. याविषयीचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.

ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या बैठकीत ‘लॉयल्टी-कम-लाइफ’  याखेरीज ठेव संलग्न विमा योजनेअंतर्गत (ईडली) सभासदाचा खाते कालावधीत मृत्यू झाल्यास किमान २.५० लाख रुपये विमा संरक्षणही देण्याच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. हे दोन्ही प्रस्ताव सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आले आहेत.