इंदूर : पोलिसांनी २३ वर्षाच्या सॉफ्टवेअर इंजिनिअर युवतीवर रेप करून तिचा व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करण्याच्या आरोपावरून भावनगर येथील एका विद्यार्थ्याला अटक करण्यात आली आहे.
भंवरकुआ पोलिस ठाण्यातील एक एसआयने सोमवारी सांगितले की, बंगळुरूच्या प्रायव्हेट कंपनीत कार्यरत असलेल्या एका सॉफ्टवेअर इंजिनिअर तरूणीने तक्रार दाखल केली आहे. इंदूरमध्ये शिक्षण घेत असताना तिची मैत्री गुजरातच्या भावनगर राहणाऱ्या रिषभ कटोदियाशी (२५) झाली. रिषभही सिव्हिल इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे.
तरूणीने दिलेल्या तक्रारीनुसार ४ जानेवारी २०१४ रोजी रिषभ इंदूरला आला आणि त्याने तरूणीला इंदूर फिरण्यासाठी सांगितले. यावेळी कॉफीमध्ये गुंगीचे औषध टाकले आणि तरूणीचा अश्लिल व्हिडिओ बनविला. दोन महिन्यानंतर अश्लिल व्हिडिओ सार्वजनिक करण्याची धमकी देऊन तरूणीला बडोद्याला बोलावले. त्या ठिकाणी तीन दिवस कथितपणे रेप केला. त्यावेळी तरूणीने काही फोटो डिलीट केले. त्यानंतर तरूणी बडोद्याहून परत आली.
त्यानंतर काही दिवसांनी रिषभने काही अश्लिल फोटो तरूणीला पाठविले. यावेळी तो तिला लग्न करण्यासाठी दबाव टाकत होता. तरूणीने नकार दिल्यावर तिला ठार मारण्याची, फोटो सार्वजनिक करण्याची तसेच आई-वडिलांना सांगण्याची धमकी दिली. या सर्व छळाला कंटाळून तरूणीने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. रिषभला भेटण्यासाठी इंदूरला बोलावले. रविवारी त्याला अटक करण्यात आले. पोलीस या प्रकरणात चौकशी करत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.