अहमदाबाद : सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना दिलासा मिळाला आहे. कारण सोहराबुद्दीन शेखचा भाऊ रूबाबुद्दीनने आमित शाह यांच्याविरोधातील याचिका स्वच्छेने परत घेतली आहे. मात्र आपल्या जीवाला धोका असल्याने, आपण याचिका परत घेतल्याचं रूबाबुद्दीनने म्हटलं असल्याचं बीबीसीने म्हटलं आहे.
रूबाबुद्दीनने २००७ साली सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश यांना पत्र लिहून सांगितलं होतं की, गुजरात एटीएस टीमने सोहराबुद्दीनला बनावट चकमकीत ठार केलं. यानंतर सु्प्रीम कोर्टाने या प्रकरणाची चौकशी गुजरात पोलिसांकडे सोपवली होती.
२००५ चं प्रकरण
गुजरात एटीएसच्या टीमने नोव्हेंबर २००५ मध्ये सोहराबुद्दीन आणि त्यांची पत्नी कौसर यांना कथित प्रकरणी हैदराबादहून सांगली जातांना रस्त्यात अपहरण केलं होतं, यानंतर त्यांना गुजरातची राजधानी गांधीनगर येथे बनावट चकमकीत मारण्याचा आरोप आहे.
याचिका परत घेतली कारण...
मात्र रूबाबुद्दीने यांने बीबीसीशी बोलतांना म्हटलं, "ज्या पद्धतीने हे प्रकरण चालवण्यात येत होतं, ते खूपचं अनोखं होतं. मी मागील १० वर्षापासून अमित शाह यांना निर्दोष ठरवण्याच्या निर्णयाविरोधात लढत होतो. मात्र मी तेव्हापासून भितीत जगतोय, माझ्या परिवाराचं आणि माझं जीवन धोक्यात आलं होतं, जर मी याचिका परत घेतली नसती, तर माझा जीवही गेला असता."
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.