नवी दिल्ली : भारतीय नौसेनेचे बी.एम. शर्मा यांनी जगातलं सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट सर केलं आहे. बी.एम. शर्मा नौदलात डिफेन्स सिव्हिलियन आहेत. 2015 साली त्यांनी एव्हरेस्ट सर करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र हिमशिखर चढत असताना एव्हरेस्ट बेस कॅम्प परिसरात भूकंप झाल्यानं ते बर्फाखाली गाडले गेले.
बर्फाच्या ढिगा-यातून बाहेर येऊन त्यांनी या दुर्घटनेत जखमी झालेल्या लोकांना मदत करणाऱ्या बचाव पथकाचा भाग म्हणून काम केलं. आपली चिकाटी न सोडता त्यांनी दोन वर्षांनी पुन्हा एव्हरेस्टवर चढाई केली आणि काल माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करत आपलं स्वप्न पूर्ण केलं. एव्हरेस्ट सर करणारे भारतीय नौदलातले ते पहिले डिफेन्स सिव्हिलयन बनलेत.