'...तर गंगा माताही मोदींच्या मातेच्या अस्थी विसर्जनाला नकार देईल'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाना साधताना काँग्रेसच्या एका नेत्याची पातळी घसरलेली दिसली.

Updated: Mar 18, 2015, 11:41 AM IST
'...तर गंगा माताही मोदींच्या मातेच्या अस्थी विसर्जनाला नकार देईल' title=

देहरादून : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाना साधताना काँग्रेसच्या एका नेत्याची पातळी घसरलेली दिसली.

प्रदेश काँग्रेस अध्यक्ष किशोर उपाध्याय यांना मंगळवारी बोलताना आपल्या जिभेवर ताबा ठेवणं कठिण गेलं. गंगा स्वच्छता आणि संरक्षणबद्दल बोलताना उत्तराखंडची उपेक्षा होत असल्याचं त्यांचं म्हणणं होतं. पण, हे बोलताना त्यांनी नरेंद्र मोदींनाच काय पण इतरांनाही बोचणारी टीका केली. 

'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंगा मातेची फसवणूक केलीय. जर मोदींच्या आईचा मृत्यू झाला आणि त्यांच्या अस्थी विसर्जनासाठी ते हरिद्वारला दाखल झाले तर असं होऊ नये की गंगा माता त्यांची अस्थी विसर्जन करण्यासाठीही नकार द्यावा' असं उपाध्याय यांनी म्हटलं.

किशोर उपाध्याय काँग्रेसच्या मुख्यालयात पत्रकारांशी संवाद साधत होते. केंद्र सरकारवर प्रदेश सरकारची उपेक्षा करण्याचा आरोप करत त्यांनी 24 मार्च रोजी प्रदेश काँग्रेस दिल्लीत पंतप्रधान निवासस्थानी 24 तासांचा सत्याग्रह करणार असल्याचं स्पष्ट केलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.