मुंबई : जागतिक बाजारापेठेत कमकुवत संकेतामुळे आणि दागिने निर्मात्यांनीची मागणी घटल्यामुळे राष्ट्रीय सराफा बाजारात गुरूवारी सोन्याचे भाव २०० रुपयांनी घटून एक महिन्याची खालच्या पातळीला गाठली आहे. सोन्याचे भाव २६,६५० प्रति १० ग्रॅम असा भाव आहे.
उद्योगांची मागणी आणि शिक्के तयार करणाऱ्या निर्मात्यांनी कमकुवत मागणीमुळे ५५० रुपये घट येऊन प्रतिकिलो ३६७०० रुपये असे चांदीचा भाव होता.
गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीवर चांगले व्याज मिळण्याचे संकेत मिळाल्याने सोन्याची खेरदी कमी झाली. तसेच स्थानिक दागिने निर्मात्यांनी आणि किरकोळ खरेदीदारांनी सोन्याची खरेदी कमी केल्याने सोन्याचे भाव कमी झाले.
जागतिक पातळीवर सिंगापूरमध्ये सोने ०.३ टक्के घटीसह ११,४१.७६ डॉलर प्रति औंस तर चांदीत २.५ टक्क्यांची घट होऊन प्रति औस किंमत १५.६५ डॉलर झाली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.