गोरक्षनाथ मंदिरात मिळते दहा रुपयात पोटभर जेवण

उत्तर प्रदेशमध्ये सामान्य लोकांसाठी आधीच अच्छे दिन होते आणि पुढेही आहेत. गोरक्षनाथ मंदिरात केवळ १० रुपयांत पोटभर जेवण मिळत आहे.

Intern Intern | Updated: Apr 12, 2017, 01:44 PM IST
गोरक्षनाथ मंदिरात मिळते दहा रुपयात पोटभर जेवण title=

गोरखपूर : उत्तर प्रदेशमध्ये सामान्य लोकांसाठी आधीच अच्छे दिन होते आणि पुढेही आहेत. गोरक्षनाथ मंदिरात केवळ १० रुपयांत पोटभर जेवण मिळत आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यात स्वस्त दरात अन्न देण्याची घोषणा केली. मात्र, त्याआधी गोरक्षनाथ मंदिरात नागरिकांना अन्नासाठी कमी पैसै मोजावे लागत आहेत. केवळ १० रुपयांत पोटभर जेवण मिळत आहे. मंदिरात गेल्या आठ वर्षांपासून दहा रुपयांत पोटभर जेवण मिळते. या कॅंटिंगची सुरूवातही योगी यांनी केली होती.

योगींनी सुरु केलेल्या कँटिंगमध्ये हजारो लोक एकाच वेळी रोज जेवण घेतात. दहा रुपयात येथे डाळ, भात, दोन भाज्या आणि दोन पोळ्या मिळतात. तसेच येथे कोणतीही जात – पात किंवा धर्म पाळला जात नाही. सर्व जाती धर्माचे लोक येथे जेवणासाठी एकत्र जमतात. तेथील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्रीपदी रुजू होण्याआधी योगी स्वत: याकडे जातीने लक्ष देत होत