मोदी सरकारनं दिली कामगारांसाठी खुशखबर...

मोदी सरकारनं कामगारांसाठी एक खुशखबर दिलीय. सरकारनं कामगारांच्या किमान वेतनात 23 रुपयांनी वाढ केलीय. त्यामुळे आता कामगारांना किमान 160 रुपये प्रतिदिन मजुरी मिळू शकेल. 

Updated: Jul 8, 2015, 08:54 AM IST
मोदी सरकारनं दिली कामगारांसाठी खुशखबर...  title=

नवी दिल्ली : मोदी सरकारनं कामगारांसाठी एक खुशखबर दिलीय. सरकारनं कामगारांच्या किमान वेतनात 23 रुपयांनी वाढ केलीय. त्यामुळे आता कामगारांना किमान 160 रुपये प्रतिदिन मजुरी मिळू शकेल. 

उल्लेखनीय म्हणजे, कामगारांच्या दैनिक किमान वेतनात ही वाढ तब्बल दोन वर्षानंतर करण्यात आलीय. ही वाढ 1 जुलैपासून लागू होईल.

केंद्रीय श्रम आणि रोजगार राज्यमंत्री बंडारु दत्तात्रय यांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय किमान वेतनात (NFLMW) वाढ करण्याचा निर्णय औद्योगिक कामगारांसाठी किरकोळ महागाई वाढविण्याच्यादृष्टीने करण्यात आलाय. 

NFLMW सध्या 137 रुपये आहे... यात वाढ करून आता ते प्रतिदिन 160 रुपये करण्यात आलंय. याबाबत सर्व मुख्यमंत्री आणि उपराज्यपालांना पत्रही धाडण्यात आलंय, अशी माहिती दत्तात्रय यांनी दिलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.