नवी दिल्ली : आक्रमक झालेला काँग्रेस पक्ष, एकवटलेला जनता परिवार आणि सभागृहात काँग्रेसला पाठबळ देण्याच्या डाव्या पक्षांच्या रणनीतीमुळे केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपने र्अथसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या चार दिवसांमध्ये जास्तीत जास्त कामकाज पार पाडण्याचा चंग बांधला आहे.
यात प्रामुख्याने जीएसटी, भ्रष्टाचार प्रतिबंध आणि काळ्या पैशाविरोधातील विधेयकांचा समावेश आहे. आज प्रामुख्याने जीएसटी विधेयकावर चर्चा करून तो मंजूर करवून घेण्यावर सरकारचा भर असेल. त्यापाठोपाठ भ्रष्टाचार प्रतिबंध आणि काळ्या पैशाविरोधात विधेयक मंजूर करवून घेण्यात येईल.
विरोधी पक्ष, सहकारी शिवसेना आणि स्वाभिमानी संघटनेच्या विरोधामुळे जमीन अधिग्रहण विधेयकात नऊ सुधारणा सरकारने ऐनवेळी केल्या. मुदत संपल्यामुळे दुसऱ्यांदा अध्यादेश काढला, मात्र पुढील चार दिवसांच्या कामकाजात जमीन अधिग्रहण विधेयक सभागृहात मांडले जाणार नसल्याचे स्पष्ट संकेत सरकारने दिले आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.