श्रीनगर : आजपासून GSTकाऊंसिलची महत्वपूर्ण बैठक सुरु होत आहे. दोन दिवस चालणा-या बैठकीत GSTचे दर निश्चीत होण्याची शक्यता आहे. आज सुरु होणा-या बैठकीत सर्वराज्यांचे अर्थमंत्री सहभागी होणार आहेत. या बैठकीचेअध्यक्ष केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली असतील. या बैठकीसाठी श्रीनगरमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
या बैठकीत तब्बत 87 प्रकारच्या सेवा आणि वस्तूंची कोडिंग तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर GSTचे दर निश्चित होतील. या कोडींगला नेटवर्कद्वारे जोडण्यात येईल. सेवांसाठी 12 आणि 18 टक्क्यांचे दोन स्लॅब असतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सोन्यावर 4 टक्के GST लावला जाऊ शकतो. 50लाखां पेक्षा कमी वार्षीक उत्पन्न असलेल्या रेस्टोरंट आणि व्यापा-यांना कंपोजीशन स्कीम मिळण्याची शक्यता आहे. यानुसार GSTचा दर पाच टक्के होईल. GST काउंसिल ने आधीच 5, 12, 18 आणि 28% चे 4 स्लैब निर्धारीत केले आहेत. चैनीच्या वस्तू आणि सेवांवर अतिरिक्त सेसही लागणार आहे. सरकारनं १ जुलैपासून GST लागू करण्याची घोषणा केली आहे.