www.24taas.com, झी मीडिया, मेरठ
गुजरात राज्य दंगामुक्त झाल्याचा दावा, गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी केला आहे. गुजरातमध्ये दहावर्षांपूर्वी प्रत्येक दिवशी दंगा होत होता. मात्र आता गुजरातमधील लोक मिळून मिसळून रहायला लागले आहेत.
गुजरातमध्ये एकात्मतेच्या वातावरणाची निर्मिती झाली आहे. गुजरातमध्ये आता कुठेही दंगल होत नाही. यामुळे गुजरात दंगल मुक्त झाला आहे, असं नरेंद्र मोदी यांनी मेरठच्या जाहीर सभेत सांगितलं.
गुजरात दंगलीवर अनेक वर्षानंतर नरेंद्र मोदी जाहीर सभेत पहिल्यांदा बोलले आहेत. गुजरात दंगलीचा आरोप असल्याने अनेक वेळा गुजरात दंगलीवर बोलणं नरेंद्र मोदी टाळत होते. मात्र नरेंद्र मोदी यांनी आज सहज गुजरात दंगलीच्या विषयात जाहीर सभेत हात घातला.
काँग्रेसपक्षाचा मित्र पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुजरात दंगल प्रकरणी नरेंद्र मोदी यांना क्लिनचीट दिली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने नरेंद्र मोदी यांना क्लिनचीट दिली आहे. यामुळे नरेंद्र मोदी यांना क्लिनचीट देण्यात वावगं काय असा सवाल राष्ट्रवादीने उपस्थित केला आहे.
राष्ट्रवादी नेत्यांच्या क्लिनचीटनंतर मोदींनी पहिल्यांदा गुजरात दंगलीवर जाहीर सभेत भाष्य करण्याचं धाडस दाखवल्याची चर्चा आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.